मुंबई- गोरेगाव येथील मोतीलाल नगरचा पुनर्विकास म्हाडा करणार आहे. परंतु, याला काही स्थानिकांनी विरोध केला आहे. स्थानिकांचे म्हणणे म्हाडापर्यंत पोहोचावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे म्हाडा कार्यालयात शालिनी ठाकरे यांनी म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना निवेदन दिले.
मुंबई उपनगरातील गोरेगाव (पश्चिम) विभागातील मोतीलाल नगर क्र. १,२ व ३ वसाहतींचा पुनर्विकास करणारी योजना म्हाडातर्फे राबवण्यात येणार आहे. म्हाडातर्फे सदर वसाहतींचा पुनर्विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याबाबतची निविदा प्रक्रिया सप्टेंबर २०१९ या महिन्यात आणि प्रकल्पाची पायाभरणी ऑक्टोबर २०१९ या महिन्यात करण्यात येणार आहे. परंतु, गोरेगाव येथील अनेक पुनर्विकास प्रकल्प रखडल्यामुळे येथील रहिवाशी भीतीच्या छायेत आहेत. या रहिवाशांची मागणी मांडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली म्हाडा अधिकाऱ्यांची भेट घेऊन रहिवाशांची व्यथा मांडली.
गोरेगांव (पश्चिम) विभागातील बहुतांश विभाग सध्या पुनर्विकासाच्या जाळ्यात अडकलेला आहे. निरलॉन वसाहत, एम. आय. जी वसाहत, सिद्धार्थ नगर, ज्ञानेश्वर नगर या वसाहतींचा पुनर्विकास गेली १५ वर्षे रखडून पडलेला आहे. अशा परिस्थितीत हा पुनर्विकास रखडला तर आपण रस्त्यावर या भीतीमुळे मोतीलाल नगरच्या पुनर्विकासाच्या प्रकल्पाला सामोरे जाण्याची मानसिकता सध्यातरी मोतिलाल नगर मधील रहिवाशांमध्ये नाही आहे.
बेघर झालेल्या कुटुंबांची अवस्था, त्यांना वेळेवर न मिळणारे भाडे, म्हाडाकडून नेमण्यात आलेल्या खासगी विकासकांकडून या कुटुंबांची होणारी फसवणूक या गोष्टी मोतीलाल नगरमधील रहिवाशांना माहीत आहे. त्यामुळे म्हाडा असो वा खाजगी विकासक, जोपर्यंत या कुटुंबाना त्यांची घरे आणि थकीत भाडे मिळत नाहीत, तोपर्यंत मोतीलाल नगरमधील रहिवाशी पुनर्विकास प्रकल्पाला तयार होणार नाहीत. त्यात म्हाडाने मोतीलालनगरमधील रहिवाशांना विचारात न घेता जर या पुनर्विकास प्रकल्पाचा आराखडा तयार केला असेल तर मात्र मोतीलाल नगर मधील रहीवाशी अशा प्रकारच्या मनमानी कारभाराचा एकजुटीने कडाडून विरोध करतील, असे शालिनी ठाकरे यांनी सांगितले.
काय आहेत मागण्या ?
१) मोतीलाल नगरच्या आजूबाजूला असलेले सर्व पुनर्विकास प्रकल्प मग ते म्हाडाचे असो वा खासगी, लवकरात लवकर पूर्ण करावे.