महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भारतीय संगीत कंपन्यांनी पाकिस्तानच्या गायकांसोबत काम करणे बंद करा - मनसे - मनसे

मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी म्हटले आहे, ‘आम्ही टी-सीरीज, सोनी म्यूझिक, वीनस, टिप्स म्यूझिक या भारतीय कंपन्यांना पाकिस्तानी गायकांसोबत काम न करण्यास सांगितले आहे. या कंपन्यांनी पाकिस्तानी गायकांसोबत काम करणे तत्काळ थांबवावे, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू.’

राज ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

By

Published : Feb 17, 2019, 3:17 PM IST

मुंबई - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) चित्रपट शाखाने भारतीय संगीत कंपन्यांना पाकिस्तानी गायकांसोबत काम बंद करण्यास सांगितले आहे.

मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी म्हटले आहे, ‘आम्ही टी-सीरीज, सोनी म्यूझिक, वीनस, टिप्स म्यूझिक या भारतीय कंपन्यांना पाकिस्तानी गायकांसोबत काम न करण्यास सांगितले आहे. या कंपन्यांनी पाकिस्तानी गायकांसोबत काम करणे तत्काळ थांबवावे, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू.’

हल्लीच भूषण कुमार यांच्या टी-सीरीजने २ वेगवेगळ्या गाण्यांसाठी राहत फतेह अली खान आणि आतिफ असलम यांच्यासोबत करार केला आहे. यावर बोलताना खोपकर म्हणाले, की आमच्या इशाऱ्यानंतर कंपनीने यूट्यूब चॅनलवरून संबंधितांची गाणी हटवली आहे. दरम्यान, २०१६ मध्ये उरी हल्ल्यानंतरही मनसेने भारतात काम करणाऱ्या सर्व पाकिस्तानी कलाकारांना देश सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details