मुंबई -राज्यातील विविध प्रश्न तसेच दुष्काळाबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने विशेषतः शेतकरी पीक विमा कंपन्यांवर कारवाई करावी, शेतकऱ्यांना पिकासाठी योग्य हमी भाव मिळावा, अशी मागणी केली. केंद्राने दिलेली मदत अजून वाढवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन यावेळी राज्यपालांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले.
राज्यातील प्रश्नांबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची घेतली भेट - संदीप सावंत बातमी
शेतकऱ्यांना पीक विमा लवकरात लवकर दिला पाहिजे आणि जे देणार नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात 90 टक्के भाव दिला नाही, उसाला किमान 3 हजार 500 रुपये भाव दिला पाहिजे,अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
हेही वाचा-IFFI 50 : राजकारण आणि धर्मांधतेमुळ निर्वासितांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर - गोरान पास्कल्जेविक
शेतकऱ्यांना पीक विमा लवकरात लवकर दिला पाहिजे आणि जे देणार नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात 90 टक्के भाव दिला नाही, उसाला किमान 3 हजार 500 रुपये भाव दिला पाहिजे. ज्यांनी शेतकऱ्यांना योग्य भाव दिला नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून व्याजासह पैसे घेऊन शेतकऱ्यांना दिले पाहिजे. सोयाबीनला 7 हजार तर कापसाला 8 हजार भाव मिळाला पाहिजे, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे केली. मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील, संदीप सावंत, अभिजित पानसे, अविनाश जाधव, दिलीप धोत्रे या शिष्टमंडळाने काल (बुधवारी) राज्यपालांची भेट घेऊन ही मागणी केली.