मुंबई : राज्यात लोकांना आलेल्या वाढीव वीजबिल दराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिष्टमंडळ राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेण्यासाठी मुंबई हायकोर्टासमोरील कार्यालयात गेले होते. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री यांनी मनसे शिष्टमंडळाला वाढीव बिलांच्या प्रकरणी लक्ष घालून, योग्य ती कारवाई करत बिल कमी करण्याचे आश्वासन दिले. जर, कंपन्यांनी बिल कमी केली नाहीत तर मनसेचा दणका माहितीच असेल, असा इशारादेखील मनसेने यावेळी दिला.
'वाढीव वीजबिल कमी होणार', मनसेच्या शिष्टमंडळाला ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन
मनसेची ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. ज्यांचे वीजबिल वाढीव आले आहेत, त्यात सुधारणा करण्यात येणार आहे. त्या सुधारित बिलात किमान 50 टक्के सूट द्यावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. यावर कोणाचाही वीज पुरवठा खंडित होणार नाही, असे आश्वासन राऊत यांनी मनसे शिष्टमंडळाला दिले आहे.
राज्यात आवाजावी विजबिलाच्या तक्रारी रोजच पाहायला मिळत आहे. आधीच कोरोनाचे संकट त्यात वाढीव विजबिलाची भर यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. तसेच, ही चर्चा सकारात्मक झाली असल्याचे मनसे नेत्यांनी सांगितले आहे. ज्यांचे वीजबिल वाढीव आले आहेत, त्यात सुधारणा करण्यात येणार आहे. त्या सुधारित बिलात किमान 50 टक्के सूट द्यावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली. यावर कोणाचाही वीज पुरवठा खंडित होणार नाही, असे आश्वासन राऊत यांनी मनसे शिष्टमंडळाला दिले आहे. सरकारने सुरू केलेली भाववाढ ही कोरोनाचे संकट संपल्यावर करा, अशी मागणीदेखील मनसेने केली आहे.
सद्या सांमजयस्यपणे चर्चा करण्याची वेळ आहे. पण, ज्या खासगी कंपन्या मनमानी कारभार करतील, त्यांना मनसेचा दणका काय असतो ते कळेल. तसेच कोकणातील वादळग्रस्तांना मदत अजून मिळाली नाही त्याबद्दलही आम्ही लवकरच आमची भूमिका स्पष्ट करू असे उर्जामंत्री यांना मनसे शिष्टमंडळ भेटल्यानंतर मनसे नेते अविनाश अभ्यंकर 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले. मनसे नेते बाळा नांदगांवकर, अविनाश अभ्यंकर, आमदार प्रमोद (राजू) पाटील,अविनाश जाधव आणि इतर पदाधिकारी ऊर्जामंत्र्यांना भेटत आपल्या मागण्या आज त्यांच्याकडे ठेवल्या आहेत. त्याला ऊर्जामंत्री सकारात्मक असल्याचे सांगत लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे मनसे नेत्यांनी यावेळी सांगितले.