महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोकण दौरा म्हणजे चक्रीवादळाच्या वेगालाही लाजवेल; मनसेची मुख्यमंत्र्यांवर टीका - cm uddhav thackeray criticized by opposition

मुख्यमंत्री साहेब, आम्हाला तुमचा अभिमान आहे. चक्रीवादळाला लाजवेल, असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी-देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे, तसे तुम्ही फिरलात. खरंच बेस्ट सीएम,” असे ट्विट संदीप यांनी केले आहे.

mns criticism
मनसे टीका

By

Published : May 22, 2021, 9:38 PM IST

मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी तौक्ते वादळामुळे नुकसान झालेल्या कोकण भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भेट देऊन पाहणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चार तासांच्या दौऱ्यावरून विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. मनसेने देखील या दौऱ्यावरून शिवसेनेवर टीका केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा म्हणजे चक्रीवादळाच्या वेगालाही लाजवेल असा होता, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केली.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलेले ट्विट

हेही वाचा -नुकसानग्रस्तांना मदत मिळत नाही, म्हणून आम्ही "वैफल्यग्रस्त"

संदीप देशपांडे यांचे ट्विट -

मुख्यमंत्री साहेब, आम्हाला तुमचा अभिमान आहे. चक्रीवादळाला लाजवेल, असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता. पुराणकाळात देवी-देवता वगैरे मनोवेगाने फिरायचे, तसे तुम्ही फिरलात. खरंच बेस्ट सीएम,” असे ट्विट संदीप यांनी केले आहे.

मी ट्विटमधून मुख्यमंत्र्यांवर टीका करत नाही तर वस्तुस्थिती सांगत आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले. तोक्ते चक्रीवादळ 140 ते 160 किमी वेगाने आले. आता मुंबई आणि सिंधुदुर्ग हे अंतर किती आहे? मुख्यमंत्री किती वेळात सिंधुदुर्गला जाऊन मुंबईला परतले? असा सवालही त्यांनी केला. तर पंतप्रधान मोदींना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.

हेही वाचा -मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासंदर्भात विरोधकांनी उधळलेली मुक्ताफळे दुर्दैवी - खासदार सुनील तटकरे

ABOUT THE AUTHOR

...view details