मुंबई- औरंगाबाद शहराचे नामांतर 'संभाजीनगर' करण्याची मागणी शिवसेनेकडून अनेक वर्षापासून होत आहे. आता मनसेने देखील यात उडी घेतली आहे. बुधवारी मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई सेंट्रल एसटी डेपोतून सुटणाऱ्या मुंबई ते औरंगाबाद एसटीला संभाजीनगर असे फलक लावले.
मनसेने उचलला हिंदुत्वाचा 'विडा', एसटीवर लावले 'संभाजीनगर' फलक - एसटीचे फलक बदलले मुंबई बातमी
मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई सेंट्रल एसटी डेपोतून सुटणाऱ्या मुंबई ते औरंगाबाद एसटीला संभाजीनगर असे फलक लावून औरंगाबादचे संभाजीनगर असे नाव झालेच पाहिजे, अशा घोषणा दिल्या.
![मनसेने उचलला हिंदुत्वाचा 'विडा', एसटीवर लावले 'संभाजीनगर' फलक mns-change-st-bus-name-bord-in-mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6073057-thumbnail-3x2-mum.jpg)
मनसेने लावले एसटीवर 'संभाजीनगर' फलक...
मनसेने लावले एसटीवर 'संभाजीनगर' फलक...
मनसेच्या मुंबादेवी विधानसभेच्या वतीने हे फलक लावण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी औरंगाबादचे संभाजीनगर असे नाव झालेच पाहिजे, अशा घोषणाही दिल्या.