महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

झेंड्यानंतर मनसेने कार्यक्रमाचे ठिकाणही बदलले.. 'या' शहरात होणार 'वर्धापन दिन' - वर्धापन दिन मनसे

आगामी नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाच्या वर्धापन दिनाचा सोहळा यंदा नवी मुंबईत होणार आहे.

mns-anniversary-program-will-held-in-navi-mumbai
झेंड्यानंतर मनसेने कार्यक्रमाचे ठिकाणही बदलले..

By

Published : Feb 25, 2020, 9:30 AM IST

मुंबई- मनसेने 'झेंडा' आणि 'अजेंडा' बदलल्यानंतर आखलेल्या नव्या रणनीतीनुसार पक्षाचे मोठे कार्यक्रम हे मुंबई पुरते न घेता मुंबई बाहेर घेण्याचे ठरविले आहे. त्याच अनुषंगाने दरवर्षी मुंबईत साजरा होणारा मराठी भाषा दिन ठाण्यात होणार आहे. तर 9 मार्चचा मनसेचा वर्धापन दिन पहिल्यांदाच नवी मुंबईत होणार आहे.

झेंड्यानंतर मनसेने कार्यक्रमाचे ठिकाणही बदलले..

हेही वाचा-पंतप्रधान मोदी हे 'वाटाघाटीत कठोर' असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले; यामागचा नेमका अर्थ काय?


नवी मुंबई पालिकेची येऊ घातलेली निवडणूक लक्षात घेऊन पक्षवाढीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला आहे. 23 जानेवारीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मनसेने पक्षाच्या झेंड्यासह विचारसरणीतही बदल केला. तसेच अमित ठाकरे यांच्याकडे पक्षाने नवी जबाबदारी सोपवली. यावेळी अधिवेशनात राज्यभरातून मनसैनिक हजर होते. त्यांच्यात मोठा उत्साह होता. हे सर्व टिकवून ठेवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचे मोठे कार्यक्रम फक्त मुंबईत न घेता मुंबई बाहेर इतर शहरात घेण्याचा ठरवले आहे.


आगामी नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाच्या वर्धापन दिनाचा सोहळा यंदा नवी मुंबईत होणार आहे. त्याचप्रमाणे तिथीप्रमाणे साजरी केली जाणारी शिवजयंतीही मनसे यंदा औरंगाबादमध्ये साजरी करण्याची शक्यता आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच ही व्यूहरचनेचा आखण्यात आली आहे.


मनसेचे सर्व कार्यक्रम हे मुंबईत होत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष वाढीसाठी आणि पक्ष बांधणीसाठी राज्यात सगळीकडे कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे पक्ष तळागाळात पोहोचण्यास मदत मिळणार असल्याचे मनसे नेते शिरीष सावंत यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details