महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अन्यथा खळखट्याक करू, मनसेचा फायनान्स कंपनीला इशारा - मनसेचे आंदोलन बातमी

लॉकडाऊनच्या काळात एका फायनान्स कंपनीकडून हप्त न भरणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात होता. तसेच ज्यांचे कर्ज थकीत आहे त्यांच्यावर जप्तीची कार्यवाही करण्यात येत होती. त्या फायनान्स कंपनीला मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट देत निवेदन दिले. काही काळ कर्ज वसूली थांबवा, अन्यथा खळखट्याक करू, असा इशाराही दिला.

फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतना मनसैनिक
फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतना मनसैनिक

By

Published : Aug 24, 2020, 9:21 PM IST

मुंबई -लॉकडाऊनच्या काळात इएमआयचे हप्ते भरू न शकणाऱ्या कर्जदारांना काही फायनान्स कंपन्यांकडून अवाजवी दराने व्याज आकारणी होत आहे. जर वेळेत व्याज भरले गेले नाही तर जप्तीची कार्यवाही देखील केली जाते. याच पार्श्वभूमीवर मुलुंडमध्ये एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी अवाजवी व्याज आकारणी व जप्तीच्या कार्यवाही विरोधात आंदोलन केले. यावेळी मनसेतर्फे जोरदार निर्दशने करण्यात आली.

बोलताना राजेंद्र देशमुख

लॉकडाऊनमध्ये अनेकांचा नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. लोकांना खायला अन्न नाही आहे. त्यात फायनान्स कंपनी अनेकांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तगादा लावत आहेत. अवाजवी व्याज आकारणी करत आहेत. या विरोधात आज (24 ऑगस्ट) मनसे मुलुंडतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी या कंपनीकडून कर्जदारांवर थेट जप्तीची कारवाई न करता सवलत दिली जाईल, असे आश्वासन करण्यात आले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जर पुन्हा अवाजवी व्याज आकारणी करण्यात आली तर खळखट्याकचा इशारा यावेळी मनसे कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.

कोरोनामुळे लोक त्रस्त झाले आहेत. या वाईट दिवसात देखील फायनान्सकडून लोकांची छळवणूक सुरू केली जात होती. लोकांच्या वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात येत होती. याबाबत काही लोकांनी या कंपनीविरोधात मनसेकडे तक्रारी केल्या होत्या, असे मनसैनिकांनी सांगितले आहे. त्यामुळे त्या विरोधात हे आंदोलन केल्याचे मनसेने सांगितले. फायनान्स कंपनीने मनसेची मागणी तात्काळ त्यांनी मान्य केली असल्याची माहिती मनसेचे राजेंद्र देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा -गर्भवतींनो सावधान..! मुंबईत कोरोनाग्रस्त मातेकडून नाळेद्वारे बाळाला संसर्ग; बाळाचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details