महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हा कसला फकीर! हा तर बेफिकीर, राज ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका

अजित डोवाल यांच्या मुलाची कंपनी आहे, त्याचा एक सहकारी अरब तर दुसरा पाकिस्तानी आहे. ते का देशद्रोही होत नाही? असा सवाला त्यांनी यावेळी केला. पुलवामा हल्ल्यानंतर मी डोवाल यांच्यावर टीका केली, तर भाजप आयटी सेलच्या लावारीस मुलांनी मला ट्रोल केले. पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही, असे राज यावेळी म्हणाले.

राज ठाकरे

By

Published : Mar 9, 2019, 9:14 PM IST

मुंबई - मोदी फकीर नसून बेफिकीर आहेत, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. ते १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सभेत बोलत होते. भाजपला राष्ट्रभक्ती शिकवण्याचा अधिकार कुणी दिला? मोदी राष्ट्रभक्त आहेत तर मग नवाज शरीफ यांना वाढदिवसानिमित्त मोदी त्यांना केक भरवायला पाकिस्तानात का गेलेत? अजित डोवाल आणि पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार यांच्यात २७ डिसेंबर गुप्त बैठक झाली, ती कशासाठी, असे सवाल यावेळी राज यांनी उपस्थित केले.

अजित डोवाल यांच्या मुलाची कंपनी आहे, त्याचा एक सहकारी अरब तर दुसरा पाकिस्तानी आहे. ते का देशद्रोही होत नाही? असा सवाला त्यांनी यावेळी केला. पुलवामा हल्ल्यानंतर मी डोवाल यांच्यावर टीका केली, तर भाजप आयटी सेलच्या लावारीस मुलांनी मला ट्रोल केले. पण मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही, असे राज यावेळी म्हणाले.


ABOUT THE AUTHOR

...view details