मुंबई- कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला पुराने विळखा घातला आहे. या आपात्कालीन परिस्थितीत मुंबईतील डॉक्टरांची चमू व इतर मदत पाठवण्याबाबतचा निर्णय पालिका प्रशासनाने शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे. यावेळी महापौर, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी तसेच अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पुराचा विळखा; मुंबई महापालिकेतील डॉक्टर जाणार मदतीला - meeting
मागील पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने कोल्हापूर, सांगलीत हाहाकार माजवला आहे. या दोन्ही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन आर्थिक व जीवितहानी झाली आहे. येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक यंत्रणा तेथे पोहोचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील डॅाक्टरांची टीम देखील औषधांसह पूरग्रस्त भागात पाठवण्याचा पालिका प्रशासनाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
मागील पाच ते सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने कोल्हापूर, सांगलीत हाहाकार माजवला आहे. या दोन्ही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन आर्थिक व जीवितहानी झाली आहे. येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक यंत्रणा तेथे पोहोचल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील डॅाक्टरांची टीम देखील औषधांसह पूरग्रस्त भागात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय इतर मदतीसाठी साधनसामुग्रीही पाठवली जाणार आहे. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीचे पाणी परिसरात भरले होते. त्यामुळे येथील रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतरण करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बैठकीत आढावा घेऊन उपायोजना करण्याबाबत चर्चा झाली. याबाबत संबंधित प्राधिकरणांची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे.