महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मेट्रो प्रकल्पातील मजूर पुन्हा मुंबईच्या वाटेवर; एमएमआरडीएचा जीव भांड्यात - एमएमआरडीए कामगार न्यूज

मेट्रो 6, 7 आणि 4 मार्गाचे काम वेगात सुरू होते. मात्र, मार्चमध्ये लॉकडाऊनमुळे कामाला ब्रेक लागला. तर आत्ता कामाला वेग देण्याची वेळ असताना पुरेसे मजुरच नसल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळेच चक्क कधी नव्हे ते एमएमआरडीएने कंत्राटी मजूर भरतीची जाहिरातही काढली. याद्वारे 10 हजाराहून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. मात्र, त्या अगोदरच गावी गेलेले मजूर मुंबईत परतायला सुरुवात झाली आहे.

Labour
मजूर

By

Published : Jun 27, 2020, 10:24 PM IST

मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊनच्या भीतीने मेट्रो प्रकल्पातील हजारो मजूर आपापल्या गावी परतले आहेत. आता अनलॉकनंतर कामाला वेग देण्याची वेळ आली असताना मजूर नसल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची(एमएमआरडीए) चिंता वाढली होती. मात्र, आता हळूहळू गावी गेलेले मजूर मुंबईत परत येऊ लागले आहेत त्यामुळे एमएमआरडीएचा जीव भांड्यात पडला आहे. प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 500 पेक्षा अधिक मजूर परत आले आहेत. तर जुलै अखेरीस सर्व मजूर परत येतील असा विश्वास एमएमआरडीएला आहे.

मेट्रो 6, 7 आणि 4 मार्गाचे काम वेगात सुरू होते. मात्र, मार्चमध्ये लॉकडाऊनमुळे कामाला ब्रेक लागला. तर आत्ता कामाला वेग देण्याची वेळ असताना पुरेसे मजुरच नसल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळेच चक्क कधी नव्हे ते एमएमआरडीएने कंत्राटी मजूर भरतीची जाहिरातही काढली. याद्वारे 10 हजाराहून अधिक जागा भरल्या जाणार आहेत. मात्र, त्या अगोदरच गावी गेलेले मजूर मुंबईत परतायला सुरुवात झाली आहे.

मेट्रो 6 मधील 115 मजूर महाराष्ट्र, बिहार, गुजरात, आसाम आणि पश्चमि बंगालवरून मुंबईत परत आले आहेत. मेट्रो 7 मधील 386 मजूर महाराष्ट्रातून तर 115 मजूर परराज्यातून मेट्रो साईटवर आले आहेत. जुलैपर्यंत आणखी 175 मजूर महाराष्ट्रातून तर 755 मजूर परराज्यातून मुंबईत येणार आहेत. मेट्रो 4-4ए प्रकल्पातील 586 मजूर परत आले असून आणखी काही मजूर परत येण्याची शक्यता आहे त्यामुळे आत हे प्रकल्प पुन्हा वेगात सुरू होतील.

ABOUT THE AUTHOR

...view details