महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एमएमआरडीएची व्याप्ती वाढली; रायगड ते पालघरपर्यंत झाला विस्तार - mumbai metro

मुंबई महानगर प्रदेशामध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांमुळे ही हद्द वाढविण्याची मागणी होत होती. लोकप्रतिनिधिंच्या मागणीमुळे एमएमआरडीए क्षेत्रात वाढ केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

एमएमआरडीए

By

Published : Jun 20, 2019, 4:42 PM IST

Updated : Jun 20, 2019, 10:20 PM IST

मुंबई- महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) सीमा वाढविण्याच्या ठरावास गुरुवारी विधानसभेत मान्यता देण्यात आली. यामुळे वसई, पनवेल, अलिबाग, खालापूर व पेण तालुक्याचा उर्वरित भाग आणि पालघर तालुका पूर्णपणे या प्राधिकरणात समाविष्ट होणार आहे.

एमएमआरडीए क्षेत्रात वाढ

या संदर्भातील एमएमआरडीए अधिनियमातील अनुसूचीमध्ये सुधारणा करण्यासाठीचा मसुदा विधानसभा सभागृहात मांडण्यात आला होता. त्यामुळे एमएमआरडीए क्षेत्रात २ हजार चौ.कि.मीची वाढ होणार आहे. लोकप्रतिनिधिंच्या मागणीने एमएमआरडीए क्षेत्रात वाढ केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बृहन्मुंबई व सभोवतालच्या प्रदेशामध्ये लोकसंख्येची वाढ आणि त्या अनुषंगाने विकसनशील क्षेत्राचे सुयोग्य नियोजन व नियोजित विकास व्हावा, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. १९६७ साली अधिसूचित झालेल्या मुंबई महानगर प्रदेशचे भौगोलिक क्षेत्र ३ हजार ९६५ चौरस किलोमीटर होते. त्यानंतर त्याची हद्द वाढवून ते ४ हजार ३५५ चौरस किलोमीटर करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने पेण व अलिबाग तालुक्याचा काही भाग समाविष्ट करण्यात आला होता.

मुंबई महानगर प्रदेशामध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांमुळे ही हद्द वाढविण्याची मागणी होत होती. या प्रकल्पांमध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-सुरत शीघ्रगती महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, पालघर जिल्हा व उद्योग केंद्र, मुंबई पोरबंदर प्रकल्प, विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर, विविध मेट्रो प्रकल्प आदी प्रकल्पांचा समावेश आहे. या निर्णयामुळे एमएमआरडीएच्या एकूण क्षेत्रात २ हजार चौ.किमी इतकी वाढ होणार आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत भास्कर जाधव, छगन भुजबळ, जयंत पाटील आणि मनिषा पाटील, किसन कथोरे, नसीम खान, सुरेश लाड यांनी सहभाग घेतला.

Last Updated : Jun 20, 2019, 10:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details