महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टाँप्स सिक्यूरीटी कंपनीचे आरोप एमएमआरडीएने फेटाळले, आर्थिक गुन्हे शाखेकडे अहवाल सादर - Mumbai Latest News

'टाँप्स कंपनीने एमएमआरडीएला ५०० सुरक्षा रक्षक कंत्राटी पद्धतीने दिले होते. त्यापैकी ७० टक्के सुरक्षा रक्षक कामावर येत होते. मात्र तरीही सर्वच सुरक्षा रक्षकांचे वेतन कापले जात असल्याचा आरोप रमेश अय्यर यांनी केला होता. दरम्यान या आरोपांमध्ये तथ्थ नसल्याचा खुलासा एमएमआरडीएने आपल्या अहवालात केला आहे.

MMRDA Latest News
टाँप्स सिक्यूरीटी कंपनीचे आरोप एमएमआरडीएने फेटाळले

By

Published : Dec 21, 2020, 10:53 PM IST

मुंबई -'टाँप्स कंपनीने एमएमआरडीएला ५०० सुरक्षा रक्षक कंत्राटी पद्धतीने दिले होते. त्यापैकी ७० टक्के सुरक्षा रक्षक कामावर येत होते. मात्र तरीही सर्वच सुरक्षा रक्षकांचे वेतन कापले जात असल्याचा आरोप रमेश अय्यर यांनी केला होता. त्यांनी याप्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार देखील दाखल केली होती. दरम्यान या आरोपांमध्ये तथ्थ नसल्याचा खुलासा एमएमआरडीएने आपल्या अहवालात केला आहे. तसेच कोणताही आर्थिक गैरव्यवाहर झाला नसल्याचे देखील म्हटले आहे.

एमएमआरडीएने आर्थिक गुन्हे शाखेला दिलेलेल्या आपल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, २०१३ ते २०१७ आणि २०१७ ते २०२० या सहा वर्षातील निवीदा प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला. यापैकी सहा कंपन्यांना मान्यता देण्यात आली होती. या सहा कंपन्यांमध्ये टाँप्स सिक्यूरीटी कंपनीचाही सहभाग होता. टाँप्स सिक्यूरटीला एमएमआरडीएने सुरक्षा रक्षक पुरवण्याचं जे कंत्राट दिलं, त्या कंत्राटानुसार एमएमआरडीएला सुरक्ष रक्षक पुरवण्यात आले. आणि याबदल्यात टाँप्स सिक्यूरीटी कंपनीला निवेदत ठरल्याप्रमाणे मोबदला देखील देण्यात आला. मात्र जे सुरक्षा रक्षक गैरहजर होते, त्यांचे वेतन कपात करण्यात आल्याचे एमएमआडीएने सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details