मुंबई - दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आयसोलेशन सेंटर (विलगीकरण) कमी पडू लागले आहेत. त्यामुळे आता आयसोलेशन सेंटर तयार करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसी) पुढे सरसावले आहे. त्यानुसार दहिसर चेक परिसरात 800 बेडचे तर बोरीवली, कंदर पाडा येथे 250 बेडचे आयसोलेशन सेंटर उभारण्यात येणार असल्याचे एमएमआरसीने आज जाहीर केले आहे.
कोरोनाच्या लढ्यात एमएमआरसीचा पुढाकार, दहिसरमध्ये 800 तर बोरिवलीत 250 बेडचे आयसोलेशन सेंटर
दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आयसोलेशन सेंटर (विलगीकरण) कमी पडू लागले आहेत. त्यामुळे आता आयसोलेशन सेंटर तयार करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसी) पुढे सरसावले आहे.
मुंबईत 28 हजाराहून अधिक रूग्णसंख्या असून, सद्या अंदाजे 19 हजाराहून अधिक रूग्ण अॅक्टिव्ह आहेत. मात्र, त्याचवेळी आता रुग्णालये आणि आयसोलेशन सेंटरही अपुरी पडू लागली आहेत. त्यामुळे आता विविध सरकारी यंत्रणाची मदत घेतली जात आहे. त्यानुसार एमएमआरडीएने बीकेसीत 1 हजार 8 बेडचे नॉन-क्रिटिकल रुग्णालय बांधून पूर्ण केले आहे. तर याच रुग्णालयालगत आणखी 1 हजार बेडचे क्रिटिकल रुग्णांसाठी रुग्णालय बांधत आहे. तर आता एमएमआरसीही पुढे आली आहे.
दहिसर चेकनाका येथे 800 बेडचे सेंटर उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. 800 पैकी 200 बेड ऑक्सिजनची सुविधा असणारे असतील. तर कंदर पाडा, बोरिवली आरटीओ कार्यालयानजीक २५० बेडच्या सेंटरचे ही काम सुरू झाले आहे. या कक्षात high dependency units(HDU) तसेच डायलिसिसची सुविधा असणार आहे. या दोन्ही सेंटरचे काम पुढच्या 15 दिवसात पूर्ण करण्याचा एमएमआरसीचा मानस आहे. या सेंटरमुळे उपनगरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.