महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दहिसर कोरोना केअर सेंटरचे काम युद्धपातळीवर सुरू - Coronavirus in Dahisar

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) मुंबईतील दहिसर चेक नाका तसेच बोरिवली कांदरपाडा येथे कोरोना केअर सेंटर उभारण्यात येत आहे.

कोरोना केअर सेंटर
कोरोना केअर सेंटर

By

Published : May 31, 2020, 11:05 AM IST

मुंबई -महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून प्रशासनाने त्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) मुंबईतील दहिसर चेक नाका तसेच बोरिवली कांदरपाडा येथे कोरोना केअर सेंटर उभारण्यात येत आहे.

दहिसर जकात नाका येथे कोरोना केअर सेंटरचे काम दोन दिवसांपूर्वी सुरू झाले असून येत्या 2 आठवड्यात ते पूर्ण करण्याचे ध्येय एमएमआरसीने ठेवले आहे. या सेंटरमध्ये 800 ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था असणार आहे.

दहिसर कोरोना केअर सेंटरचे काम युद्धपातळीवर सुरू

बोरिवली आरटीओ कार्यालयाजवळील कांदरपाडा येथे डायलिसिस सुविधा असणारे 220 बेडची अतिदक्षता विभागांचे एक विलगीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे. यामुळे दहिसर परिसरातील नागरिकांना कोरोनाच्या उपचारासाठी मुंबई शहरात जाण्यापासूनचा त्रास कमी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details