शैली चौधरी काँग्रेस पक्ष आमदार मुंबई :मुंबईतील जीओ सेंटर येथे तीन दिवशीय राष्ट्रीय विधायक संमेलन पार पडले. देशातील विविध पक्षातील 1 हजार 500च्या वर आमदारांनी या संमेलनाला उपस्थित लावली. या संमेलनात अनेक विषयावर चर्चा झाली. आमदारांसाठी उपयुक्त असलेल्या विषयांवर या संमेलनात चर्चा झाली. संमेलनात सहभागी झालेल्या काही आमदारांनी आपला अनुभव ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितला आहे. या प्रकारचे संमेलन देशात होत राहिले पाहिजेत. यामुळे इतर राज्यातील आमदारांना भेटण्याची संधी मिळते. तसेच विचारांची देवाणघेवाण होत असल्याचे शैली चौधरी म्हणाल्या.
शैली चौधरी :हरियाणा राज्यातील नारायणगड मतदारसंघातील काँग्रेस पक्षाची आमदारानेही उपस्थिती लावली होती. नारायणगड येथील आमदार आहेत शैली चौधरी. राजकीय परंपरा असल्यामुळे नारायणगड मतदारसंघात प्रथमच महिला आमदार होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. या मतदारसंघतून त्याचे पती रामकिशन गुज्जर दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तर सासरे 4 टर्म आमदार राहिले आहेत. केंद्रातील सरकार महिला सुरक्षा बाबत गंभीर दिसत नसल्याचे शैली चौधरी यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने महिला कुस्तीपटू यांच्या भावना समजून खासदार ब्रिजभूषण सिंहांवर कारवाई करायला हवी, असल्याचे मत व्यक्त केले आहे.
शेतकऱ्यांचा प्रश्न केला उपस्थितीत : देशातील शेतकऱ्यांची स्थिती वाईट झाली आहे. यात हरियाणातील 80 टक्के शेतकरी आहेत. त्यांची स्थिती वाईट आहे. शेतीमधून पीक घेत असताना मशागतीसाठी खर्च जास्त आहे. पण उत्पन्न कमी आहे. त्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नसल्याची खंतही शैला चौधरी यांनी बोलून दाखवली. यावर सरकारने सांगितले होते की, 2023 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल. परंतु तसे अजून झाले नाही.
मनविंदर सिंग आमदार पंजाब : आपचे सरकार येऊन दीड वर्ष झाले आहेत. आतापर्यंत कमाई झाली पाहिजे हाच त्या पक्षाचा अजेंडा असायचा. मात्र आम आदमी पार्टीचा मी आमदार नाही तरी माझ्या मतदारसंघतील सर्वच लोक आमदार आहेत. लोकांना आम्हीच सेवा देत आहोत. आमच्या राज्यात मोहल्ला दवाखाना सुरु झाले. त्यासोबतच शेतकऱ्यांना शेतीसाठी वेळेत वीज पुरवली जात आहे. यापूर्वी सिंगापूर असो की परदेश अभ्यास दौऱ्यासाठी फक्त आमदार जायचे पण ज्यांना जायला हवे आहे, अशा लोकांना आमचे सरकार पाठवते. दोन वर्षातील पोलीस खात्याकडून मागोवा घेतला तर आधी पोलीस स्थानकात तक्रारीचे प्रमाण जास्त होते. आता मात्र ते प्रमाण आमच्या सरकारच्या काळात शून्य झाले आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्या सारख्या सामान्य कुटुंबातील इंजिनिअर एक रुपया खर्च न करता आमदार होतो, हे फक्त आम आदमी पार्टीत होऊ शकते. अशा प्रकारची प्रतिक्रिया पंजाब विधानसभेचे आमदार मनविंदर सिंग यांनी दिली.
हेही वाचा -
- Devendra Fadnavis : भारताला विकसित राष्ट्र बनवायचे असेल, तर प्रत्येकाची भूमिका महत्वाची - देवेंद्र फडणवीस
- National Legislative Conference : राष्ट्रीय विधायक संमेलनासाठी देशातील जवळपास 2 हजार आमदार येणार मुंबईत