मुंबई :पक्षातील नाराजी उफाळून आल्याने शिवसेनेत दोन गट तयार झाले.मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील नाराजीतूनच पक्षाविरोधात बंड पुकारला. आता याच नाराजीचा सामना मुख्यमंत्री शिंदे यांना करावा लागत आहे. शिंदे गटात आमदार नाराज (MLA unhappy in Shinde group) असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचे टेन्शन वाढवले (tension of CM Eknath Shinde increased) आहे.
मुख्यमंत्री शिंदेंसाठी डोकेदुखी :आमदार बच्चू कडू, आमदार संजय शिरसाट यांच्यापाठोपाठ चिमणअप्पा पाटील आणि गुलाबराव पाटील यांच्यातील वाद उफाळून आला होता. आता आमदार सुहास कांदे यांची नाराजी समोर आली आहे. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरून कांदे आणि दादा भुसे यांच्यात एकमत झाले नसल्याने कांदे कमालिचे नाराज आहेत. पालकमंत्र्यांच्या बैठकीत आमदारांना बोलावले जात नाही. इतरांना विश्वासात न घेता जिल्ह्यात पदाधिकारी नेमले आहेत. नियुक्त पदाधिकारी पक्ष विस्तारासाठी अकार्यक्षम आहेत, अशा तक्रारी कांदे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडल्या. कांदे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. आमदारांची नाराजी ही मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असल्याचे बोलले जात (Shinde group MLA) आहे.