महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंना कोरोनाची लागण

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाँऊट वरुन याबाबत माहिती दिली आहे. संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले होते. यादरम्यानच कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. यानंतर कोरोना चाचणी केली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली, अशी माहिती पटोले यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.

nana patole
नाना पटोले

By

Published : Sep 4, 2020, 7:53 PM IST

मुंबई- राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली आहे. पटोले यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. 7 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळ अधिवेशनामध्ये त्यांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गेले अनेक दिवस साकोली विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थितीची पाहणी आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले होते. यादरम्यानच कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती, असे पटोले यांनी म्हटले आहे. लक्षणे जाणवू लागल्यानंतर कोरोना चाचणी केली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली, अशी माहिती पटोले यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

सध्या प्रकृती ठणठणीत असून काळजी करू नये. गेल्या काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन पटोले यांनी केले आहे. लवकरच कोरोनावर मात करून सर्वांच्या सेवेत दाखल होईन, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी विधानसभा व विधान परिषदेचे अधिवेशन 7 आणि 8 सप्टेंबर या दोन दिवसात होणार आहे. अधिवेशन सुरू होण्यास दोन दिवसांचा कालावधी राहिला असताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या गैरहजेरीत विधानसभेचे कामकाज करावे लागणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details