मुंबई : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena Leader Sanjay Raut) यांनी शिंदे गटाच्या आमदारांचा समाचार घेतला होता. दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. गुहाटीतील कामख्या देवीला रेडे पाठवल्याचे संजय राऊत यांचे विधान चांगलेच व्हायरल झाले होते. पुढे राऊत यांच्याकडून सतत रेडे असा उल्लेख होत असल्याने, शिंदे गटाचे डॅशिंग आमदार संजय गायकवाड यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर सडकून टीका (MLA Sanjay Gaikwad Highly Criticized) केली. 'राऊत हे सोडलेला बोकड' असल्याचे विधान गायकवाड यांनी केले. त्यांच्या विधानामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
राऊतांचा उल्लेख बोकड :संजय गायकवाड म्हणाले की, राऊत वेळोवेळी 50 रेडे असा उल्लेख वारंवार करतात. संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलून घेतले होते. बाळासाहेबांच्या जाज्वल्य हिंदुत्वाचे पुरस्कार आणि धर्माला मानणारे लोक आहोत. राऊत यांनी जी भाषा वापरली आहे; त्याच्या मध्ये उल्लेख केला की, कामख्या देवीला रेडे पाठवले. जर आम्ही रेडे असू, तर राऊत मोकाट असलेला बोकड आहेत. जो देवाच्या नावाने सोडलेला असतो, त्याला कोणी कापत नाही किंवा कोणी चांगल वागवत नाही. त्याच्या अंगाचा घाण वास येत राहतो, असा बोकड आई कामख्या देवी सुद्धा स्वीकारणार नाही, असे गायकवाड म्हणाले.