महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rais Shaikh on Love Jihad : आमदार रईस शेख यांचे थेट सरकारलाच आव्हान; लव जिहाद प्रकरणांची आकडेवारी सिद्ध करून दाखवा...

लव्ह जिहाद प्रकरणांबाबत राज्य सरकारने सांगितलेला आकडेवारी सिद्ध करावी असे आव्हान समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी सरकारला दिले आहे. राज्य सरकारने काल विधानभवनात लव जिहाद प्रकरणांची आकडेवारी दिली होती.

Rais Shaikh on Love Jihad
आमदार रईस शेख

By

Published : Mar 10, 2023, 8:33 PM IST

आमदार रईस शेख संवाद साधताना

मुंबई : राज्यामध्ये जवळपास एक लाख लव जिहादची प्रकरण समोर आल्याची आकडेवारी महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मांडली आहे. महिला व बाल विकास मंत्राकडून मांडण्यात आलेला आकड्यानंतर विरोधकांनी यावर जोरदार हल्ला चढवला आहे. यावर समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी सरकारवर टीका केली आहे.

आकडेवारी सिद्ध करून दाखवा : समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी थेट राज्य सरकार आणि महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांना आव्हान दिले आहे. राज्यात एक लाख लव जिहादची प्रकरण झाली असतील तर त्याबाबत आकडेवारीनुसार माहिती उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी सांगितले. मात्र, राज्य सरकारकडून अद्याप याबाबत कोणतेही उत्तर आलेले नाही. केवळ जनतेमध्ये दिशाभूल करण्यासाठी हा आकडा मंत्र्यांकडून दिला जात असल्याचा आरोपही रईस शेख यांनी केला आहे.

उच्च न्यायालयात याचिका दाखल :राज्यात आंतरधर्मीय विवाहबाबत माहिती गोळा करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर समिती गठित करण्यात आली. मात्र या समितीच्या निर्मितीपासूनच आम्ही या सर्व मुद्द्याला विरोध करत होतो. या समितीच्या माध्यमातून केवळ राज्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विकासाचा कोणताही मुद्दा समोर आणायचा नाही याबाबत कोणतेही भाष्य करायचे नाही. मात्र, लव जिहादसारखे मुद्दे समोर आणून केवळ जनतेची दिशाभूल केली जात आहे. याबाबत आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली असल्याचे रईस शेख यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले.


राज्य सरकारचा मोठा दावा : राज्यात 'लव्ह जिहाद'ची एक लाखाहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत, असा मोठा दावा राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकारने गुरुवारी अधिवेशनात केला. विधानसभेत महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात 50-50 हजार लोक बाहेर पडत आहेत, आणि हे स्वतःहून होत नाही. ते म्हणाले की, राज्यातील जनतेच्या मनात आग आहे कारण महाराष्ट्रात लव्ह जिहादची १ लाखाहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत, त्यामुळे संपूर्ण समाज व्यथित झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :Lotus aims for Kerala after NE : ईशान्येतील राज्यांनंतर भाजपची केरळकडे वाटचाल, 'डाव्यांचा बालेकिल्ला' करणार का ध्वस्त..?

ABOUT THE AUTHOR

...view details