मुंबई- मनी लॉन्ड्रिंग संदर्भात तपास करत असलेल्या ईडीकडून टॉप सिक्युरिटीचा मालक अमित चांदोले यास अटक केली गेली. त्यानंतर त्याच्या वाढीव ईडी कस्टडीसाठी विशेष न्यायालयमध्ये मागणी करण्यात आली होती. मात्र विशेष न्यायालयाने अमित चांदोलेची कस्टडी ईडीला देण्यास नकार दिल्यामुळे विशेष न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात ईडीकडून उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आहे.
भक्कम पुरावे व साक्षीदार असल्याचा ईडीचा दावा -
या याचिकेत ईडीने म्हटले आहे, की ईडीकडे मनी लॉंड्रिंगसंदर्भात अमित चांदोले व प्रताप सरनाईक यांच्या दरम्यान झालेल्या व्यवहारासंबंधी पुरावे व साक्षीदार असूनसुद्धा विशेष न्यायालयाकडून आरोपीची कस्टडी देण्यात आलेली नाही. ईडी कस्टडीत प्रताप सरनाईक यांचा या प्रकरणातील सहभाग उघड होईल, असा ईडीने दावा केला आहे.
प्रताप सरनाईक यांचे नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव-
प्रताप सरनाईक यांना तिसऱ्यांदा ईडीकडून समन्स; तर, चांदोलेच्या कोठडीसाठी हायकोर्टात धाव - mla Pratap Saranaik
विशेष न्यायालयाने अमित चांदोलेची कस्टडी ईडीला देण्यास नकार दिल्यामुळे विशेष न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात ईडीकडून उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यात आली आहे. तसेच प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे.
अमित चांदोले यांनी मुंबई उच्च न्यायालयमध्ये ईडीच्या विरोधात आरोप केला आहे. यावेळी त्याने म्हटले की प्रताप सरनाईक यांचे नाव घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. ईडी कस्टडीमध्ये माझ्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप अमित चांदोले यांनी केला होता. मात्र, ईडीने अमित चांदोलेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने या संबंधातला निर्णय राखून ठेवलेला आहे.
प्रताप सरनाईक यांना तिसऱ्यांदा समन्स -
ईडी चौकशी दरम्यान आपली बाजू भक्कम पणे मांडण्यासाठी आपल्याला चौदा दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी प्रताप सरनाईक यांच्या लीगल टीमकडून करण्यात आली होती. मात्र, यावर कुठलीही वेळ वाढवून देण्यास स्पष्टपणे नकार देत तिसऱ्यांदा प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. येत्या गुरुवारी प्रताप सरनाईक यांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे.