मुंबई-2014च्या विधानसभा निवडणुका आघाडी आणि युती शिवाय पार पडल्या. या निवडणुकांत राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवल्या होत्या. या महासंग्रामात राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेससह भाजपच्या उमेदवारांचा कस लागला. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. काही उमेदवार या लढाईतही भरगच्च मतांनी निवडून येत आपला जनाधार दाखऊन देऊ शकले तर, काही अगदी काठावर पास झाल्याचे पहायला मिळाले. तर, काही दिग्गजांना मतदारांनी घरी बसवले.
भाजपला शिवसेना 'नकोशी' झालीये का?
सर्वात कमी मतांनी निवडून येण्याचा विक्रम नुकतेच शिवसेनेत गेलेले श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांच्या नावावर आहे. ते अवघ्या 77 मतांनी निवडून आले होते. अवधूत हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सुनिल तटकरे यांचे पुतणे आहेत.
दुसरा क्रमांक लागतो तो करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांचा. त्यांनी राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांचा अवघ्या 257 मतांनी पराभव करत विजय मिळवला होता. बागल यांनी पाटलांच्या निवडीला आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ती फेटाळण्यात आली होती.