महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Aaditya Thackeray : टक्केवारी प्रमुख म्हणून उल्लेख करत आदित्य ठाकरेंवर निलेश राणेंची टीका - MLA NItish Rane

मुंबई मनपात शिंदे फडणवीस सरकारने काढलेल्या पाच हजार कोटीच्या निविदा काढल्याप्रकरणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली होती. आमदार नितेश राणे ( MLA NItish Rane ) आणि अमित साटम ( MLA Amit Satam ) यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरेंवर ( Critics on Aaditya Thackeray ) निशाणा साधला आहे.

Critics on Aaditya Thackeray
निलेश राणेंची टीका

By

Published : Nov 19, 2022, 6:53 PM IST

मुंबई -मुंबई मनपात शिंदे फडणवीस सरकारने काढलेल्या पाच हजार कोटीच्या निविदा काढल्याप्रकरणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आवाज उठवला. भाजप आणि शिंदे गटाचा करदात्या मुंबईकरांच्या पैशांवर डोळा आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली. भाजपकडून या टीकेला आज प्रत्युत्तर देण्यात आले. त्यामुळे टक्केवारीवरून आदित्य ठाकरे ( Critics on Aaditya Thackeray ) आणि भाजपमध्ये जुंपली असून आमदार नितेश राणे ( MLA NItish Rane ) आणि अमित साटम ( MLA Amit Satam ) यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

आदित्य ठाकरेंवर निलेश राणेंची टीका


आदित्य ठाकरेंनी केली होती टीका - मुंबईतील रस्त्यांची एकाच वेळी कामे करण्यासाठी शिंदे फडणीस सरकारने पाच हजार कोटींच्या निविदा काढल्या. विकासकांकडून या निविदांना प्रतिसाद मिळालेला नाही. निकष जाचक असल्याने पुन्हा निविदा काढण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. मुंबईत विविध ४२ संस्था असून रस्त्यांची कामे करताना त्यांना सोबत घेऊन काम करावे लागते. एकाच वेळी मुंबईतील रस्त्यांची कामे शक्य नाहीत. सरकारचा मुंबई मनपाच्या केवळ पैशांवर डोळा आहे. आगामी काळात मुंबईत पाणी साचल्यास त्याला मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला होता.

आदित्य ठाकरेंचा सचिन वाझे व्हायला वेळ लागणार नाही -भाजपचे आमदार नितेश राणे आणि अमित साटम यांनी या टीकेला उत्तर दिले आहे. भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, टक्केवारी प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिंदे - देवेंद्र सरकार आल्यापासून टक्केवारी खाण्याचा कोणता स्कोप राहिलेला नाही. उलट १५०० कोटी रुपये २२४ वार्डात समान वाटण्याचे आदेश दिले आहेत. आदित्य ठाकरे यांचा यामुळे थयथयाट सुरू आहे. मतदारसंघात त्यांचे लक्ष नाही. प्रभागातील समस्या त्यांना माहीत नाहीत. तसेच, त्यांनी नेमलेल्या मनपा आयुक्तांची क्षमता काय हे त्यांना चांगले माहीत आहे. मात्र, आता कॅगमार्फत सर्व चौकशी होणार असून तुमचा सचिन वाझे होण्यास वेळ लागणार नाही, असा सूचक इशारा नितेश राणे यांनी दिला.


आदित्य ठाकरेंना बोलण्याचा अधिकार नाही -गेल्या नऊ महिन्यापासून स्थायी समितीचा व्यवहार बंद आहे. त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाल्याने अशी वक्तव्य केली जात आहे. आदित्य ठाकरे पारदर्शकतेबाबत बोलले. महाविकास आघाडी सरकार असताना अधिकाऱ्यांच्या बदलीत पैसे घेतल्याप्रकरणी तक्रारींची नोंद झाली आहे. सचिन वाझे प्रकरण, शंभर कोटीचा गैरव्यवहार आघाडी सरकारच्या काळात झाला आदित्य ठाकरे यांना विसर पडला आहे का? असा सवाल भाजपचे आमदार अमित साटम यांनी विचारला आहे. तसेच पारदर्शकता बाबत आदित्य ठाकरे यांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. गेल्या पंचवीस वर्षात विविध प्रकारचे निविदा काढून मुंबई शहराचा कोपरा आणि कोपरा विकून कोणी भ्रष्टाचार केला? असा सवाल साटम यांनी विचारला आहे.

कोविड काळात हजारो कोटींचा गैरव्यवहार -मुंबईचे रस्ते सातत्याने खोदण्यात येत असल्याने वाट लागली आहे. गेले पंचवीस वर्षे तुमचे सत्ता होती. या काळात मुंबई शहराच्या रस्त्यामध्ये युटिलिटी कॉरिडोर का नाही आणला? राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आले असून मुंबई मनपा प्रशासनाला आदेश देण्यात आले, पाच हजार कोटीच्या निविदा काढल्या आहेत. सीसी रोडचे आदेश दिले आहेत. नोंदणीकृत कंपन्यांनाच निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार आहे. मात्र निकष एवढे कडक आहेत की आजवर कंपन्या पात्र ठरलेल्या नाहीत. ठेकेदार मिळावेत म्हणून कोणत्याही वाटाघाटी केल्या नाहीत, असे सांगत साटम यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच कोविड काळात हजारो कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप, आमदार अमित साटम यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details