मुंबई -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राम मंदिराचा मुद्द्यावरून कोणत्या कायद्यांतर्गत निधीसाठी पैसे मागितले जात आहे, असा सवाल नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. प्रभू श्रीरामाने यांना कंत्राट दिला आहे का, असा सवाल देखील त्यांनी विधानसभेत उपस्थित केलेला आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त करत हिंमत असेल तर मंदिरावर चर्चा लावा, असे आव्हान केले आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज (दि. 4) चौथा दिवस असून यावेळी राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.
गोळा केलेल्या निधीची माहिती सरकारला देणार का ?
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आपल्या घरी एक गृहस्थ राम मंदिराचे पैसे मागण्यासाठी आले होते. मी त्यांना गेल्या तीस वर्षांपूर्वी राम मंदिरासाठी जो निधी संकलीत केला आहे त्याचे काय केले, असा सवाल उपस्थित केला, त्यावर ते गृहस्थ माझ्यावर चिडले. त्यामुळे या लोकांना राम मंदिरासाठी पैसे गोळा करण्याचा अधिकार कोणी दिला, कोठून किती पैसे जमा केले, याबाबातची माहिती ते सरकारला देणार आहेत का, असा सवाल उपस्थित केला.
राम मंदिराबाबत सभागृहात खुली चर्चा लावा
यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांना राम मंदिराच्या संदर्भात सभागृहात खुली चर्चा लावा, असे खुले आव्हान केले आहे.
हेही वाचा -जळगाव वसतिगृह प्रकरणातील तक्रारदार महिला वेडसर; गृहमंत्र्यांची माहिती