महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जगभरातून पंतप्रधान मोदींवर होणारी टीका अयोग्य - पटोले - पंतप्रधान मोदी बातमी

कोरोनाच्या महामारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार हे योग्यरित्या हाताळू शकले नाही. त्यामुळे सध्या देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे वाढतो. तसेच ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि देशात होणारे लसीकरण नियोजनबद्ध होताना दिसत नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जगभरातून टीका होते. मात्र, जगभरातून होणारी पंतप्रधानाची ही टीका अयोग्य असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

नाना पटोले
नाना पटोले

By

Published : May 10, 2021, 5:26 PM IST

Updated : May 10, 2021, 5:32 PM IST

मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला तीन "ची" दिले. चिनचा टाकाऊ माल, चिंता आणि चिता असे तीन "ची" दिले आहेत. तसेच काळात केंद्र सरकारने योग्य काम केले नसल्याने जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होते आहे. मात्र, ही टीका अयोग्य असल्याचेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला तीन "ची" दिले. यामध्ये पहिला "ची" हा ची चा आहे. ज्या चीनमधून आपल्या देशात केवळ टाकाऊ माल आला. तर दुसरा "ची" हा चिंतेचा आहे. आज संपूर्ण देशामध्ये लोक चिंतेत आहेत. कोरोना महामारीमुळे देशभरात लोकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, नोकरी-व्यवसाय आणि आरोग्य याबद्दल लोकांमध्ये चिंता आहे. तर तिसरा "ची" हा चितेचा आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरामध्ये मृत्यू होत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून केंद्र सरकारने योग्य ती पावले योग्य वेळी उचलणे गरजेचे होते. मात्र, केंद्र सरकार आणि पंतप्रधानांनी तसे केले नाही. म्हणून आज देशभरात लोक मृत्यूमुखी पडत असल्याची, टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

पंतप्रधानांवर देशभरातून होणारी टीका अयोग्य

कोरोनाच्या महामारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार हे योग्यरीत्या हाताळू शकले नाही. त्यामुळे सध्या देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे वाढतो. तसेच ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन आणि देशात होणारे लसीकरण नियोजनबद्ध होताना दिसत नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जगभरातून टीका होते. मात्र, जगभरातून होणारी पंतप्रधानाची ही टीका अयोग्य असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले. विदेशातून आपल्या देशाच्या पंतप्रधानांची होणारी टीका ही कोणत्याही भारतीयांसाठी आनंदाची बाब नाही. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळामध्ये ज्याप्रकारे देशभरामध्ये काम करायला पाहिजे होत, ते काम त्यांनी केले नाही. हे देखील तेवढेच सत्य आहे, असे मत नाना पटोले यांनी सांगितले.

हेही वाचा -'ऑनलाइन शॉपिंग' करताय सावधान..! 'सायबर' गुन्हेगार तुम्हाला फसवतील

Last Updated : May 10, 2021, 5:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details