महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 16, 2019, 5:30 PM IST

ETV Bharat / state

'प्रज्ञासिंह आणि नथुराम यांच्यात रक्त-परिवार-जातकुळी-भावबंदकीचे नाते'

नथुराम गोडसे हा राष्ट्रभक्त होता, असा दावा प्रज्ञा ठाकूर यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनीच आता देशाला नव्हे तर जगाला ‘नथुराम हा राष्ट्रभक्त होता का?’ हे सांगावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. प्रज्ञासिंह ठाकूर आणि नथुराम यांच्यात रक्ताचे- परिवाराचे-जातकुळीचे-भावबंदकीचे नाते आहे. त्यामुळेच तिने हे विधान केले असल्याचेही आव्हाड म्हणाले.

आमदार जितेंद्र आव्हाड बोलताना...

मुंबई- नथुराम गोडसे हा राष्ट्रभक्त होता, असा दावा प्रज्ञा ठाकूर यांनी केला आहे. नरेंद्र मोदी यांनीच आता देशाला नव्हे तर जगाला ‘नथुराम हा राष्ट्रभक्त होता का?’ हे सांगावे असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. प्रज्ञासिंह ठाकूर आणि नथुराम यांच्यात रक्ताचे- परिवाराचे-जातकुळीचे-भावबंदकीचे नाते आहे. त्यामुळेच तिने हे विधान केले असल्याचेही आव्हाड म्हणाले. ते आज मुंबईमध्ये बोलत होते.

आमदार जितेंद्र आव्हाड बोलताना...


भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा देशभक्त होता, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाचा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला.


आमदार आव्हाड यांनी, प्रज्ञा ठाकूर ही त्यांच्याच परिवारातील दहशतवादी नथुराम गोडसेला राष्ट्रभक्तीचे प्रमाणपत्र देऊन मोकळी झाली आहे. प्रज्ञासिंह ठाकूर आणि नथुराम यांच्यात रक्ताचे- परिवाराचे-जातकुळीचे-भावबंदकीचे नाते आहे. त्यामुळेच तिने हे विधान केले आहे. मात्र, हेमंत करकरे यांच्याबाबत अतिशय हीन विधान करणार्‍या प्रज्ञासिंहचे समर्थन करण्यासाठी नरेंद्र मोदी पुढे आले होते.


त्यानंतर आता प्रज्ञासिंह यांनी केलेल्या दाव्यावर मोदींची आपली काय भूमिका आहे ते जाहीर करावे. जगाला दाखवण्यासाठी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होणारे मोदी हे प्रज्ञा ठाकूरच्या समर्थनार्थ त्यावेळी उतरले होते. आत खरेच नथुराम गोडसे राष्ट्रभक्त होता का? हे मोदींनी भारताला नाही तर जगाला सांगावे, असे आव्हान दिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details