महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्र सरकारची भूमिका ब्रिटिश सरकार प्रमाणेच; आमदार हरिभाऊ राठोडांचा आरोप

रविवारी राष्ट्रीय बंजारा क्रांती दल तर्फे आझाद मैदान येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. भटक्या-विमुक्तांचे ज्वलंत प्रश्न, आरक्षण, स्कॉलरशिप वसंतराव नाईक महामंडळाला निधी इत्यादी विषयावर चर्चा या मोळाव्यात चर्चा करण्यात आली. राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेला वंचित समाज आपल्या पारंपरिक वेशभूषेत यावेळी उपस्थित होता.

आमदार हरिभाऊ राठोड
आमदार हरिभाऊ राठोड

By

Published : Jan 5, 2020, 7:58 PM IST

मुंबई -ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात भटक्या विमुक्त जमातीतील नागरिकांना सेटलमेंटमध्ये ठेवले आणि गुन्हेगारी कायदा लादला. आता भाजपही त्याच धर्तीवर तोच प्रकार करू पाहत आहे, असा आरोप आमदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. भटके विमुक्त हे हिंदू नाहीत का? असा सवाल करत राठोड यांनी एनआरसी, सीएए आणून भटके विमुक्त असलेल्या 30 टक्के लोकांवर केंद्र सरकार अन्याय करत आहे. या विरोधात आम्ही लढा उभारणार असल्याचे सांगितले. राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाच्या रौप्य महोत्सवी क्रार्यक्रम प्रसंगी राठोड बोलत होते.

1996 पासून दरवर्षी 5 जानेवारीला राष्ट्रीय बंजारा क्रांती दल भटक्या विमुक्त बारा बलुतेदारांचा मेळावा आयोजित केला जातो. यानिमित्त रविवारी राष्ट्रीय बंजारा क्रांती दल तर्फे आझाद मैदान येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. भटक्या-विमुक्तांचे ज्वलंत प्रश्न, आरक्षण, स्कॉलरशिप वसंतराव नाईक महामंडळाला निधी इत्यादी विषयावर चर्चा या मोळाव्यात चर्चा करण्यात आली. राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेला वंचित समाज आपल्या पारंपरिक वेशभूषेत यावेळी उपस्थित होता.

सरकारकडे करणार या मागण्या -

नोकर भरतीसाठी असलेले महापोर्टल बंद करून एम. पी. एस सी प्रमाणे स्पर्धा परीक्षा घेण्यात आली पाहिजे. कुठलीही अट न लावता सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. शेतकरी शेतमजुरांना पेन्शन योजना लागू करावी. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा. बढती मधील आरक्षण लागू करा. क्रिमिलेअर मधून भटक्या-विमुक्त बलुतेदारांना वगळण्यात आले पाहिजे. भटक्या विमुक्त व ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, अशा काही मागण्या आम्ही सरकारकडे करणार असल्याचेही राठोड यांनी सांगितले.



ABOUT THE AUTHOR

...view details