महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उलटतपासणीत शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा, शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार? - Pratod Sunil Prabhu

MLA Disqualification Hearing : शिवसेना आमदार अपत्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर सुरू आहे. शुक्रवारी शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची उलट तपासणी झाली. त्यावेळी त्यांनी खळबळजनक दावा केला आहे.

MLA Disqualification Hearing
MLA Disqualification Hearing

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2023, 8:12 PM IST

मुंबईMLA Disqualification Hearing :विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ठाकरे गटाची उलटतपासणी संपली आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या गैरवर्तणुकीची सुनावणी राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. शिंदे गटातील आमदारांच्या उलटतपासणीत आमदार दिलीप लांडे (शिंदे गट) यांच्यावर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी प्रश्नांचा भाडीमार केलाय.

शिंदेंना हटवण्याच्या ठरावावर लांडेंची स्वाक्षरी? :दिलीपलांडे यांची उलटतपासणी सुरू असताना वकील देवदत्त कामत यांनी 21 जून 2022 रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीचं उपस्थिती पत्रक त्यांना दाखवलं. या बैठकीत एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटाच्या सदस्यपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विशेष म्हणजे या पत्रकावर शिंदे गटाच्या 23 आमदारांच्या सह्या आहेत. त्यावर शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांचीही स्वाक्षरी आहे. तसंच त्यांनी ते पत्रक मंजूर केलंय. मात्र, दिलीप लांडे यांनी विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याच्या ठरावावर स्वाक्षरी केली नसल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार ?:याबाबत उद्धव ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना प्रतिज्ञापत्र सादर केलंय. ठाकरे गटाचे तत्कालीन प्रतोद सुनील प्रभू यांनी आमदारांना व्हीप जारी केला होता. या बैठकीत उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यात आला होता. तसंच एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यावर शिंदे गटाच्या 23 आमदारांच्या सह्या आहेत. दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, संतोष बांगर, सदा सरवणकर, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर आदी आमदार या बैठकीला उपस्थित असल्याचा दावा ठाकरे गटानं केला आहे. त्यामुळं बैठकीच्या उपस्थितीवरुन शिंदे गटाच्या आमदारांना ठाकरे गटाचे वकील कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा -

  1. भाजपाच्या नैतिकतेबद्दल खिचडी चोरांच्या सल्ल्याची गरज नाही - नितेश राणे
  2. आमदार अपात्र प्रकरण: शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंची उलट तपासणी पूर्ण, सोमवारी दीपक केसरकर यांचा नंबर
  3. आध्यात्मिक आघाडीचा शाळांमध्ये माध्यान्ह भोजनात अंडी देण्यास विरोध

ABOUT THE AUTHOR

...view details