मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, आमचा पक्ष लोकशाहीने चालणारा पक्ष आहे. पक्षात संघटनात्मक काम करावे, असे अजित पवार यांना वाटले असावे. कालच्या भाषणात अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा कार्यकाळ कोण? किती वेळा होते हे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद ओबीसी समाजाला द्यायला हवे. फक्त ओबीसी विषयी बोलून चालणार नाही तर, पदे दिली पाहिजेत अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.
इतर पक्षानी दिला ओबीसी चेहरा :महाराष्ट्रातील इतर पक्षांचा विचार केला तर, प्रदेशाध्यक्षपदावर ओबीसी चेहरा दिला आहे. ओबीसी चेहरा म्हणून भारतीय जनता पार्टीने चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसने नाना पटोले यांना पद दिले आहे. त्याचप्रमाणे राष्ट्र्वादी काँग्रेसनेही ओबीसी समाजातील व्यक्तीला संधी द्यावी असे भुजबळ म्हणाले.
मला संधी द्या, काम करेल :आमच्या पक्षातही ओबीसी नेते आहे. सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड हे ओबीसी चेहरे आहे. यांना संधी दिली जावी. मला संधी दिली तर, मी आनंदाने काम करेल असे भुजबळ म्हणाले आहेत.