मुंबई -मुंबई मराठी पत्रकार संघाच्या ( Mumbai Marathi Journalists Association ) इमारतीत नूतनीकरण करण्यात आलेल्या महिलांच्या प्रसाधन गृहासाठी आमदार भारती लव्हेकर यांच्या ‘ती फाऊंडेशन’ संस्थेकडून सॅनिटरी पॅड ( Sanitary pads ) व्हेंडींग मशिन ( Vending machine ) भेट देण्यात आले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, कार्यवाह संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, विजय तारी आणि स्नेहल मसूरकर उपस्थित होत्या.
Sanitary Pads : आमदार भारती लव्हेकरांकडून सॅनिटरी पॅड व्हेंडींग मशिन मुंबई मराठी पत्रकार संघाला भेट
आमदार भारती लव्हेकरांकडून ( MLA Bharti Lovekar ) सॅनिटरी पॅड ( Sanitary pads ) व्हेंडींग मशिन मुंबई मराठी पत्रकार संघाला ( Mumbai Marathi Journalists Association ) भेट देण्यात आली आहे.
MLA Bharti Lovekar
मासिक पाळी बाबत जनजागृती - मासिक पाळी आणि त्या अनुषंगाने येणार्या आजाराबाबत अजूनही जनजागृती करण्याची गरज आहे. ‘ती फाऊंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून ती करण्याचा प्रयत्न मी करतेय, असे भारती लव्हेकर यावेळी म्हणाल्या. या व्हेंडींग मशिनच्या वार्षिक देखभालीची जबाबदारीही लव्हेकर यांची ‘ती फाऊंडेशन’ करणार आहे. पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. लव्हेकर यांनी ही मशिन आज पत्रकार संघास सुपूर्द केली.