मुंबई -महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या महाविकासआघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. यावेळी अपक्ष आमदार बच्चू कडू यांना राज्य मंत्रीपद देण्यात आले आहे. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 'लोकांच्या कामाच्या आणि हिताच्या आड जे येतील त्यांना आम्ही आडवू', अशी खरमरीत प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
'लोकांच्या कामाआड येणाऱ्यांना आम्ही आडवणार' - मंत्री बच्चू कडू
बच्चू कडू यांना कोणते खाते मिळणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. मात्र, जे खाते मिळेल त्याचे प्रामाणिकपणे काम करेन, असे बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 'लोकांच्या कामाच्या आणि हिताच्या आड जे येतील त्यांना आम्ही आडवू', अशी खरमरीत प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
राज्य मंत्री बच्चू कडू
हेही वाचा -अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री, पाहा संपूर्ण यादी
बच्चू कडू यांना कोणते खाते मिळणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. मात्र, जे खाते मिळेल त्याचे प्रामाणिकपणे काम करेन, असे बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. आपण लेकांच्या हितासाठी काम करणार आहोत, असेही बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू धडाडीचे शेतकरी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांना कोणते खाते मिळणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.