मुंबई -मुंबई महापालिका किंवा राज्य सरकार पावसाची जबाबदारीही बहुतेक केंद्र सरकारवर ढकलतील आणि म्हणतील मोदींनी यातून मार्ग काढावा, अशी मिश्किल टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. पंतप्रधान मोदींनी सर्वांना मोफत लसीकरण करण्याची घोषणा केल्यानंतर ही लस राज्यातील शेवटच्या घटकांपर्यंत कशी पोहोचेल यासंदर्भात आज (दि. 9 जून) भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी एल संतोष, मराहाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर यांच्या उपस्थित इतर भाजप नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर आमदार अतुल भातखळकर मुंबईतील नालेसफाई आणि पावसाच्या नियोजन यावरून पालिका आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.
महापालिकेने मुंबईची तुंबई करुन दाखवली
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर अतुल भातखळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईची तुंबई झाल्याने सरकारवर निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेने मुंबईची तुंबई करुन दाखवली आहे. नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आम्ही वारंवार सांगत होतो. ते आज उघड झाल आहे, असे भातखळकर म्हणाले.