मुंबई -राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. पावसाळ्यात मुंबईची होणारी परिस्थिती सर्वांनाच माहिती आहे. मुंबई शहरातील 107 टक्के नाल्यांची सफाई झाल्याचा दावा महापौर यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (दि. 7 जून) आमदार आशिष शेलार यांनी शहरातील नाल्यांची पाहणी केली. ही नालेसफाई नाही, तर हातसफाई केली आहे, अशी घणाघाती टीका आमदार शेलार यांनी यावेळी केली.
मुंबईत नालेसफाई झालीच नाही. नाल्यात गाळ रुतलेला आहे. गाळाचे बेट तयार झाली आहेत. नाल्यावर शेती करावी अशी झाडे-झुडपे अभी आहेत. शंभर टक्के नालेसफाईचा दावा हा बिल काढण्यासाठी आहे. मुंबईच्या नालेसफाईत आता कट आणि कमिशन दोन्ही सुरू झाले आहे. यात प्रशासनाचे अधिकारीही जबाबदार आहेत.महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांचे पी. वेलारासू याला समर्थन आहे, अशी घणाघाती टीका शेलार यांनी केली आहे.