धोकादायक इमारतींबाबत आता तरी धोरण निश्चित करा, आमदार अमिन पटेल यांची मागणी - dongari
म्हाडा आणि महानगरपालिकेच्या वादात आज 14 नागरिकांना जीव गमवावा लागला. भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी दिर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी दुर्घटनाग्रस्त डोंगरी भागातील आमदार अमिन पटेल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली.
आमदार अमिन पटेल
मुंबई - विधानसभेत वारंवार मागणी करुनही धोकादायक इमारतींबाबत धोरण निश्चित केले नाही. म्हाडा आणि महानगरपालिकेच्या वादात आज 14 नागरिकांना जीव गमवावा लागला. भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी दिर्घकालीन उपाययोजना करण्याची मागणी दुर्घटनाग्रस्त डोंगरी भागातील आमदार अमिन पटेल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केली.