मुंबई - शिवसेनेचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे आपल्या आमदारांसोबत गुरुवारी राजभवनला गेले होते. राज्यात अवकाळी पडत असलेल्या पावसामुळे पिकांचे खूप नुकसान झाले आहे. तसेच ओला दुष्काळामुळे होत असलेल्या नुकसानीमुळे ठाकरे यांनी राज्यपालांशी चर्चा केली.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसह मच्छीमारांना लवकर मदत द्या, आदित्य ठाकरेंची राज्यपालांना विनंती - आदित्य ठाकरे शिवसेना आमदारांसोबत राजभवनात दाखल
शिवसेनेचे युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे आपल्या आमदारांसोबत राजभवनावर दाखल झाले आहेत. राज्यात अवकाळी पडत असलेल्या पावसामुळे पिकांचे खूप नुकसान झाले आहे. तसेच ओला दुष्काळामुळे होत असलेल्या नुकसानीमुळे ठाकरे हे राज्यपालांशी चर्चा करण्यासाठी गेले आहेत.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मात्र तेथे उपस्थित नव्हते. ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि सुनिल प्रभू हे यावेळी उपस्थित होते. पावसामुळे पिकाचे जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई मिळावी यासाठी राज्यपालांशी भेट झाली. यावेळी शिष्टमंडळाने राज्यापालांनी निवेदन दिले.
आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसह मच्छीमारांना लवकर मदत द्या अशी विनंती केली आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरुन "अवकाळी पावसामुळे जनतेची अपरिमित हानी झाली तसेच फळबागा नष्ट झाल्या. मच्छिमारांच्या नौका फुटल्या आणि मासेमारी पूर्णपणे बंद झाली. त्यामुळे राज्यातील जनतेला आधार देण्यासाठी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट सर्व प्रकारची मदत तातडीने द्यावी" असे ट्वीट करण्यात आले आहे.