मुंबई :ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मी या असंवैधानिक मुख्यमंत्र्यांना माझ्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याचे आव्हान देत आहे. मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईल आणि त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, त्यांनी वरळीतून माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
अर्थसंकल्पात महाराष्ट्राची निराशा : केंद्र शासनाचा अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. यानंतर आज मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प 2023 प्रस्तुत करण्यात आला. याविषयी बोलताना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई मनपाचा अर्थसंकल्पावर आमची नजर होती असे सांगत केंद्राच्या बजेट मध्ये मुंबई पुणे महाराष्ट्राला काही मिळाला नाही, असे निरीक्षण नोंदवत केंद्र सरकारवर टीका केली.
नवीन मोठा प्रोजेक्ट नाही : महापालिकेच्या बजेटमध्ये मुंबईकरणाकडून ज्या सूचना मागवल्या मी सूचना दिल्या होत्या की, नवीन योजना जाहीर करू नये. आमचा पहिला विजय झाला आहे यात कोणता बिग बजेट योजना नाही. नगरसेवक आणि महापौरांचा तो अधिकार आहे. आपला दवाखाना आमचा प्रोजेक्ट होता. मुंबई महापालिकेचा ५० हजार कोटींचा बजेट आज सादर झाला. नवीन मोठा प्रोजेक्ट नाही पण नवीन खर्च नाही. हे वर्षा बंगल्यावर छापून कॉन्ट्रॅक्टरचे बजेट आहे. रस्त्यांचे बजेट २ हजार कोटींचे असते ते आता सात हजार कोटींचे केले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. रस्त्यांच्या टेंडर वर महानगर पालिका कोणाला फसबत आहे यावर ब्लॅक पेपर निघावा. सौंदर्यीकरणावर साडेसातशे कोटी रुपये दिले. हे अधिकार आयुक्तांना आहेत का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.