महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी 'मिशन झिरो' राबविणार

By

Published : Jun 22, 2020, 5:58 PM IST

Updated : Jun 22, 2020, 7:19 PM IST

मुलुंड, भांडूप, अंधेरी, मालाड, बोरीवली, कांदिवली आणि दहिसर या भागात फिरते दवाखाने घराघरात जाऊन तपासणी करणार आहेत. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३६ दिवसांवर गेला आहे. मात्र, मुंबईतील काही वॉर्डमध्येच रुग्ण वाढत असल्याने खासगी संस्थांच्या माध्यमातून मिशन झिरो राबवण्यात येत असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.

Mission Zero
मुंबईत कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी 'मिशन झिरो' राबविणार

मुंबई - शहरात कोरोनाचे रोज हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यातले ६० टक्क्यांहून अधिक रुग्ण मुलुंड, भांडूप, अंधेरी, मालाड, बोरीवली, कांदिवली आणि दहिसर या भागातून येत आहेत. या भागातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी तत्वावर ५० अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून रुग्णांची साखळी तोडण्यासाठी 'मिशन झिरो' सुरू करण्यात आला आहे. हा कार्यक्रम तीन आठवडे चालणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

मुंबईत कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी 'मिशन झिरो' राबविणार

अंधेरी पश्चिम परिसरातील शहाजीराजे क्रीडा संकुल येथे भारतीय जैन संघटना, क्रेडाई एमसीएचआय, देश अपनाये यांच्या सहकार्याने रुग्णांचा शोध व उपचार यासाठी ५० फिरते दवाखाने (मोबाईल डिस्पेनसरी) सुरू करण्यात आले आहेत. मुलुंड, भांडूप, अंधेरी, मालाड, बोरीवली, कांदिवली आणि दहिसर या भागात हे फिरते दवाखाने घराघरात जाऊन तपासणी करणार आहेत. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३६ दिवसांवर गेला आहे. मात्र, मुंबईतील काही वॉर्डमध्येच रुग्ण वाढत असल्याने खासगी संस्थांच्या माध्यमातून मिशन झिरो राबवण्यात येत असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.

मुंबईत कोरोना रुग्णांची साखळी तोडण्यासाठी 'मिशन झिरो' राबविणार
क्रेडाई, जैन संघटना या संस्थांच्या ५० फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी केली जाते. त्यातील संशयित रुग्णांची यादी पालिकेला दिली जायची. आता यात बदल करून फिरत्या दवाखान्यात लॅब टेक्निशियन ठेवला जाणार आहे. तो संशयितांची त्याच ठिकाणी स्वॅब टेस्ट घेईल, या टेक्निशियनचा पगार पालिका देणार आहे. मुंबईत इतर ठिकाणी एक कोरोना रुग्ण आढळून आल्यावर त्याच्या संपर्कातील १५ जणांना क्वारंटाईन केले जात होते. मात्र, ज्या भागात जास्त रुग्ण आढळत आहेत त्या भागात एका रुग्णाच्या मागे २० जणांना क्वारंटाईन करण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना दिल्याचे आयुक्तांनी सांगितले. मुलुंड, भांडूप, अंधेरी, मालाड, बोरीवली, कांदिवली आणि दहिसर आदी भागातील रुग्ण संख्या कमी झाल्यास येत्या तीन आठवड्यांनी मुंबईमधील रुग्ण संख्येचा आकडा नक्कीच कमी होईल, असा दावा आयुक्तांनी यावेळी केला.
Last Updated : Jun 22, 2020, 7:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details