मुंबई - सध्या सोशल मीडिया हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग झाला आहे. या माध्यमातून अनेक चांगल्या-वाईट घटना घडत असतात. अशीच एक घटना शहरात घडलेली पाहायला मिळाली. व्हाट्सप ग्रुपच्या मदतीने कुर्ला नेहरूनगर पोलिसांनी तब्बल अडीच वर्षांनी एका चिमुकल्याची त्याच्या पालकांशी भेट घडवून आणली.
मुंबई : तब्बल अडीच वर्षांनी चिमुकल्याची पालकांशी भेट; व्हाट्सप झाला देवदूत
व्हाट्सप ग्रुपच्या मदतीने कुर्ला नेहरूनगर पोलिसांनी तब्बल अडीच वर्षांनी एका चिमुकल्याची त्याच्या पालकांशी भेट घडवून आणली. शुभम मांडवकर, (वय ५ वर्ष ६ महिने) असे त्या मुलाचे नाव आहे.यावेळी शुभमच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले.
शुभम मांडवकर, (वय ५ वर्ष ६ महिने) असे त्या मुलाचे नाव आहे. नेहरूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुर्ला रेल्वे स्थानकाजवळ शुभम हा तीन वर्षाचा असताना २२ मार्च २०१६ पासून हरवला होता. याबाबत वडिलांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात शुभम हरवल्याची तक्रार दिली होती.
नेहरूनगर पोलिसांनी नव्याने शोध घेत पोलिसांच्या महाराष्ट्र व्हाट्सअप ग्रुपवर ही माहिती पाठवली. अडीच वर्षापूर्वी रेल्वे सुरक्षा बलाला रेल्वेमध्ये सापडलेला मुलगा अकोला येथील उत्कर्ष शिशुगृह या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली.शुभमची फोटोवरून ओळख पटवणे कठीण होत असल्यामुळे त्यांनी अकोला जिल्हा बालकल्याण अधिकारी आणि पोलिसांच्या मदतीने शुभमच्या पालकांना अकोला येथे पाठवले. दरम्यान चिमुकल्याची ओळख पटली आणि तब्बल अडीच वर्षांनी शुभमची त्याच्या पालकांशी भेट झाली. यावेळी शुभमच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले.