मुंबई : सरस्वती वैद्य हत्याकांडात तपासादरम्यान, वैद्य यांना चार बहिणी असून त्यापैकी तीन बहिणींनी पोलिसांकडे जबाब नोंदवल्याचे पोलिसांना आढळून आले. वैद्यच्या हत्येनंतर वैद्यच्या बहिणींनी प्रथमच आरोपी मनोज सानेचा सामना केला. त्यानंतर पोलिसांनी सांगितले की, त्यांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून अशी भक्कम केस करण्याची विनंती केली आहे. वैद्य यांच्या लांब केसांचा फोटो पाहिल्यानंतर एका बहिणीने टाहो फोडला.
जबाबांची उलटतपासणी केली जाणार :तपासादरम्यान पोलिसांनी सानेचा मोबाईल स्कॅन केला असता त्यांना आढळले की, आरोपी नियमितपणे पॉर्न पाहत असे. त्याने काही पॉर्न साइट्सची नावे एका कागदावर लिहून ठेवली होती, जी पोलिसांनी जप्त केली आहे. मनोज साने याची वैद्य भगिनींसमोर बसवून त्याची लवकरच चौकशी करणार असून त्याच्या जबाबांची उलटतपासणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीची रोज अनेक तास चौकशी केली जात होती, मात्र तो आपले म्हणणे बदलत राहिला.
मृतदेहाचे फोटो काढले :पोलिसांनी सांगितले की, वैद्य यांची हत्या केल्यानंतर सानेने मृतदेहाचे फोटो काढले होते. मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, हे शोधण्यासाठी अनेक गुगल सर्चही केले होते. आरोपीने गुगल सर्च करून मृतदेहातून दुर्गंधी येऊ नये म्हणून काय करावे, याची माहिती गोळा करून त्याच्या परिसरातील एका दुकानातून निलगिरी तेलाच्या पाच बाटल्या आणल्या होत्या. मनोज साने हा गेल्या तीन वर्षांपासून मीरा रोड परिसरातील आकाशगंगा इमारतीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये वैद्य यांच्याकडे राहत होता. बोरिवलीतील एका मंदिरात सरस्वती वैद्य यांच्याशी लग्न केल्याचे आरोपीने मान्य केले आहे.
हेही वाचा :
- Meera road Murder : सानेने सरस्वती हत्येचे पोलिसांना सांगितले 'हे' कारण, मृतदेह डीएनए चाचणी करुन देणार बहिणीच्या ताब्यात
- Mira Road Murder: श्रद्धा वालकरपेक्षा भयानक सरस्वती वैद्य हत्याकांड, शंभरहून अधिक तुकडे शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले...
- Mira Road Murder Case : मनोज सानेने पोलीस चौकशीत दिली धक्कादायक माहिती, पोलीस तपासाला मिळणार वेगळे वळण?