मुंबई -'पावसाळी अधिवेशन5 आणि 6 जुलैला होणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती, त्यापेक्षा जास्त मताने जिंकू', असा विश्वास अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी याआधीच काँग्रेस आणि शिवसेना पक्षाने आपल्या आमदारांना व्हीप जारी केला आहे.
आघाडी सरकार भाजपा आमदार फोडणार?
तर, 'व्हीप जारी केल्याने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आघाडी सरकार घाबरत आहे', असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. तसेच, भाजपा आमदारांना व्हीप जारी करण्याची गरज नाही, असंही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र, नवाब मलिक यांनी 'आघाडी सरकारच्या आमदारांच्या आकड्यापेक्षा अधिक मोठ्या आकड्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकू', असा विश्वास बोलून दाखवल्याने आघाडी सरकार भाजपाच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उपाध्यक्षांना पत्र -