महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अल्पवयीन मुलीची सात महिन्यानंतर सुटका, इन्स्टाग्रामवरून लागला शोध - Minor girl mumbai

एका तरुणाने अल्पवयीन मुलीला सात महिन्यांपूर्वी पळवून फूस लावून पळवून नेले होते. अल्पवयीन मुलीच्या इंस्टाग्राम अकाऊंट आयडी मिळवल्यानंतर पोलिसांनी या मुलीचा शोध घेत 27 ऑक्टोबरला नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

arrested accused
अटक आरोपी

By

Published : Oct 31, 2020, 8:27 PM IST

मुंबई -मुंबईतील माटुंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या 20 वर्षीय आरोपीला माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला सात महिन्यांपूर्वी पळवून फूस लावून पळवून नेले असता या दोघांचा मोबाईल बंद येत होता. मात्र, पोलिसांनी पीडित मुलीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शोध घेत अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.

काय आहे प्रकरण?

11 मार्चला मुंबईतील माटुंगा येथील एका महाविद्यालयांमधून पदवीचे शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला आदित्य गीताराम नलावडे (20) या मुलाने फूस लावून महाविद्यालयांमधून पळवून नेले होते. गेल्या 7 महिन्यांपासून पोलीस या दोघांचा शोध घेत होते. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीने त्याचा मोबाईल नंबर बंद ठेवला असल्यामुळे यांचा शोध घेणे कठीण होऊन बसले होते. मात्र, फूस लावून पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीच्या इंस्टाग्राम अकाऊंट आयडी मिळवल्यानंतर पोलिसांनी या मुलीचा शोध घेत 27 ऑक्टोबरला नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली.

हेही वाचा -'मोफत कोरोना लसीचं आश्वासन निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन नाही'

दरम्यान, अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी 3 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details