मुंबई Mumbai High Court : बलात्काराचे समर्थन करण्यासाठी निकाह केला असे मान्य करता येत नाही, असे म्हणत याबाबतचे आदेशपत्र 23 डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेले आहे. मुंबईमध्ये दोन वर्षांपूर्वी इमरान खान या सव्वीस वर्षे तरुणाने त्याच्याच समुदायातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. (rejected bail application of accused) त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी आरोपी इमरान खान याच्यावर गुन्हा दाखल केला. खटला मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल झाला. दिंडोशी सत्र न्यायालयाने याबाबत त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला होता. त्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, बलात्कार करून त्या मुलीशी लग्न केले आहे, असा बहाणा कायद्यासमोर चालू शकत नाही. सबब त्याचा जामीन अर्ज न्यायमूर्ती जी ए सानप यांनी फेटाळून लावलेला आहे.
आरोपीची बाजू, त्यांचे प्रेमसंबंध होते :आरोपी इमरान खान याला जामीन मिळावा, यासाठी त्याचे वकील खलिद गुजर यांनी मुद्दा मांडला की, मुलगी अल्पवयीन आहे. परंतु, इमरान खान आणि पीडिता त्यांचे प्रेम संबंध होते. पीडिता जी मुलगी आहे तिच्या संमतीने हे लैंगिक संबंध झालेले आहे. त्यामुळे एकट्या आरोपीला या संदर्भात दोष देता येणार नाही.