महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत चालत्या रिक्षामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, रिक्षा चालकास अटक - अल्पवयीन मुलीवर चालत्या रिक्षामध्ये विनयभंग

मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर चालत्या रिक्षामध्ये विनयभंग करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी रिक्षा चालकास अटक केलीय. १९ ऑगस्टला ही घटना घडली होती. (Girl Molested in Rickshaw in Mumbai)

rickshaw
रिक्षा

By

Published : Aug 21, 2023, 10:14 PM IST

मुंबई : मुंबई पोलिसांनी चालत्या रिक्षामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षा चालकास अटक केलीय. बनश्याम सोनी (वय ५५) असे आरोपीचे नाव असून तो ठाणे जिल्ह्यातील दिवा येथील रहिवासी आहे.

काय आहे प्रकरण : १९ ऑगस्टला दुपारी बाराच्या सुमारास एक १३ वर्षीय मुलगी हिरानंदानीहून पवईतील मोरारजी नगर येथे रिक्षाने जात होती. ही मुलगी खासगी शिकवणीवरून घरी परतत होती. दरम्यान, जेव्हीएलआर रोडवर या रिक्षा चालकाने त्याचा डावा हात पाठीमागे करून अल्पवयीन मुलीच्या मांडीवरून फिरवला. मुलीने त्यास विरोध केला, मात्र तो रिक्षाचालक तिला न जुमानला त्याने विनयभंग सुरूच ठेवला.

पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखले केला : यानंतर घरी पोहचल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. मुलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून पवई पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम ३५४ (अ), ३५४ सह पोक्सो कायदा कलम ४, १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष १० चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी गुन्ह्याबाबत आवश्यक ती माहिती प्राप्त करून तपास सुरू केला.

आरोपीला घाटकोपरहून अटक : आरोपी रिक्षा चालकाबाबत पोलिसांकडे कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. पोलिसांनी प्रथम रिक्षाचा नंबर प्राप्त केला. त्यानंतर मिळालेल्या माहिती आणि वर्णनावरून संशयित रिक्षाचालकाला महिंद्रा पार्क, एल.बी.एस. रोड घाटकोपर पश्चिम येथून ताब्यात घेण्यात आले. आरोपी रिक्षा चालक बनश्याम सोनीची चौकशी केली असता, गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीच्या पूर्व इतिहासचा शोध घेण्यासाठी त्याला पवई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय.

यांचा तपासात सहभाग : तपासाची ही यशस्वी कामगिरी गुन्हे शाखा आणि प्रकटीकरण १ चे पोलीस उप आयुक्त राज तिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. गुन्हे शाखेच्या कक्ष-१० मरोळ येथील प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तोडकर, पोलीस हवालदार जगदीश धारगळकर, संतोष धनवडे, अमित जगताप, पवन शिंदे व पोलीस शिपाई चंद्रशेखर डफळे यांनी यामध्ये मदत केली.

हेही वाचा :

  1. धक्कादायक! शिक्षकाकडूनच शौचालयात 5 वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न
  2. Crime News : मित्राच्या अल्पवयीन मुलीवर अनेक महिने बलात्कार, सरकारी अधिकारी निलंबित
  3. Raid On Hotel Cityscape: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, हॉटेल सिटीस्केपवर पोलिसांचा छापा

ABOUT THE AUTHOR

...view details