पणजी : गोव्यात आई-वडिलांसोबत सुट्टीसाठी गेलेल्या मुंबईतील सहा वर्षांच्या मुलाचा उत्तर गोवा जिल्ह्यातील हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. ( Goa Hotel Swimming Pool )
Swimming Pool : सहा वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू; आई-वडिलांसोबतची सुट्टी ठरली शेवटची - आई वडिलांसोबतची सुट्टी ठरली शेवटची
गोव्यात आई-वडिलांसोबत सुट्टीसाठी गेलेल्या मुंबईतील सहा वर्षांच्या मुलाचा उत्तर गोवा जिल्ह्यातील हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. ( Goa Hotel Swimming Pool )
![Swimming Pool : सहा वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू; आई-वडिलांसोबतची सुट्टी ठरली शेवटची Swimming Pool](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16810169-thumbnail-3x2-swming.jpg)
स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
कळंगुटचे पोलिस निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी पत्रकारांना सांगितले की, मंगळवारी कँडोलिम परिसरातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली, त्यानंतर पोलिसांना फोन आला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुलगा आणि त्याचे पालक काही दिवसांपूर्वी गोव्यात आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.