मंत्रालयावर कोरोनाचे संकट कायम, आता प्रधान सचिवालाच कोरोनाची बाधा - मंत्रालयात कोरोनाचा शिरकाव
जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने मुंबईसह राज्यात चांगलाच धुमाकुळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या सत्तेचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांबरोबरच आता प्रधान सचिवही कोरोनाबाधीत होत असल्याची माहिती पुढे आली आहे.
![मंत्रालयावर कोरोनाचे संकट कायम, आता प्रधान सचिवालाच कोरोनाची बाधा Ministry Principal Secretary tests Corona positive in mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7307165-23-7307165-1590152523876.jpg)
मुंबई - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने मुंबईसह राज्यात चांगलाच धुमाकुळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या सत्तेचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांबरोबरच आता प्रधान सचिवही कोरोनाबाधीत होत असल्याची माहिती पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. एका प्रधान सचिवाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
साधारणत: ४ ते ५ दिवसांपूर्वी एका प्रधान सचिवाला मंत्रालयात अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी स्वत: ची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे सदर प्रधान सचिवांना तातडीने मुंबईतील एका नामवंत रूग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे या सनदी अधिकाऱ्यांची पत्नी डॉक्टर असून, त्यांच्या लक्षात वेळीच ही गोष्ट आल्याने त्यांनी तातडीने रूग्णालयात दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव, इतर विभागात काम करणारा एक उपसचिवांना कोरोनाची बाधा झाली. त्यात आता या नव्या प्रधान सचिवांमुळे ही संख्या तीनवर पोहोचली. प्रशासकीय अधिकारी कोरोना प्रादुर्भावामुळे फिल्डवर काम करण्यासाठी कचरत आहेत.