महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, टेस्टींग व लसीकरणाचा वेग वाढवा - विजय वडेट्टीवार - chandrapur corona situation update

रुग्णांच्या उपचाराकरिता सर्व कोविड केअर सेंटरवर मुबलक औषधसाठा उपलब्ध करावा. आवश्यकतेनुसार बाधित रुग्णांकरिता खासगी क्षेत्रातील रुग्णालयातून आवश्यक खाटांची पूर्तता करावी, असे निर्देशही चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.

minister vijay wadettiwar meeting with chandrapur district administration through vc over corona situation
मंत्री विजय वडेट्टीवारांची बैठक.

By

Published : Mar 22, 2021, 7:46 PM IST

मुंबई - चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाला आळा घालण्यासाठी बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या नागरिकांचा लवकरात लवकर शोध घ्यावा. तपासणीचे प्रमाण तसेच उपलब्ध लससाठ्यानुसार लसीकरणाचा वेग वाढवणे गरजेचे आहे. तसेच ज्या भागात कोरोनाची रुग्णसंख्या जास्त प्रमाणात आढळून येत आहे, त्याठिकाणी लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

कोरोना उपाययोजना आणि जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामांचा आढावा वडेट्टीवार यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदिप गेडाम, क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे बैठकीला उपस्थित होते.

हेही वाचा -विदारक : संशयित कोरोना रुग्णांची तीन तासांहून अधिक लॅबसमोर अहवालाकरता प्रतीक्षा

विविध सुपरस्प्रेडरचे 39 गट -

रुग्णांच्या उपचाराकरिता सर्व कोविड केअर सेंटरवर मुबलक औषधसाठा उपलब्ध करावा. आवश्यकतेनुसार बाधित रुग्णांकरिता खासगी क्षेत्रातील रुग्णालयातून आवश्यक खाटांची पूर्तता करावी, असे निर्देशही चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. प्रतिबंधाकरिता विविध सुपरस्प्रेडरचे 39 गट पाडून तपासणी करण्यात येत आहे. ‘माझे कार्यक्षेत्र, माझी जबाबदारी’ मोहीम व जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

हेही वाचा -लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळा, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे आवाहन

जिल्हा क्रीडा संकुलातील कामे लवकर पूर्ण करण्याचे निर्देश -

जिल्हा क्रिडा संकुलातील कामांचादेखील आढावा घेतला. क्रीडा संकुल येथे नव्याने तयार होत असलेले फुटबॉल मैदान, 400 मीटर सिंथेटीक ट्रॅक व प्रसाधनगृहाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश वडेट्टीवार यांनी दिले. याठिकाणी इनडोअर गेम सुरू करण्याची व्यवस्था तसेच संरक्षक भिंतीलगत व्यापारी संकुलाचे बांधकाम करता येईल का? याबाबतही चाचपणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीला पोलीस उपअधीक्षक शेखर देखमुख, शिक्षणाधिकरी उल्हास नरड (माध्यमिक), दिपेंद्र लोखंडे (प्राथमिक), सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.डी.मेंढे, राजेश नायडू, कुंदन नायडू, डॉ. किर्तीवर्धन दिक्षीत व संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details