मुंबई -राज्यासह राजधानी मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मुंबईतील लोकल बंद केली जाणार नाही मात्र, कठोर निर्बंध लावावे लागतील, असे स्पष्ट संकेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. आज त्यांनी याबाबत ट्विट केले आहे.
टास्क फोर्स समितीची बैठक -
सध्याची कोरोना परिस्थिती पाहता राज्य सरकार आता कठोर निर्णय घेणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गेल्या आठवड्यात प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी सुरू करण्याची आदेश दिले आहेत. लॉकडाउनला सर्वच स्तरातून विरोध होत असल्याने कठोर निर्बंध लावण्याबाबत राज्य स्तरावर विचार विनिमय सुरू झाला आहे. मुंबईच्या महापौरांनीही शुक्रवारपासून मुंबईत अधिक कठोर निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल सेवा उपलब्ध करणे, खासगी कार्यालयातील कर्मचारी संख्या ५० टक्क्यांनी कमी करणे, चित्रपट, मॉल तसेच प्रार्थनास्थळे बंद करण्याबाबत विचार सुरू असल्याचे महापौर म्हणाल्या. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ४ वाजता मुख्यमंत्र्यांनीही वर्षा शासकीय निवासस्थानी टास्क फोर्स समितीची बैठक बोलावली आहे.
लोकल बंद होणार नाहीत -