महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्यार्थी, पत्रकारांच्या आंदोलनाला यश; रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराचा निर्णय अखेर रद्द - उदय सामंत

पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. दरम्यान, इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराला अनेक आजी-माजी विद्यार्थी आणि पत्रकारांनी विरोध केला होता.

ranade
ranade

By

Published : Aug 14, 2021, 10:23 PM IST

पुणे - रानडे इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि पत्रकारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रानडे इन्स्टिट्यूटमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराला विद्यार्थी, पत्रकारांचा विरोध

मागील काही दिवसांपासून पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थलांतर होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांसह अनेक पत्रकारांनी या स्थलांतराच्या विरोधात आवाज उठवला. त्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी आंदोलनही उभारले होते. या आंदोलनाला यश आले.

उदय सामंत यांनी आज (14 ऑगस्ट) रानडे इन्स्टिट्यूटमध्ये विद्यापीठाचे कुलगुरू, प्रशासन, रानडे इन्स्टिट्यूटचा स्टाफ, आजी-माजी विद्यार्थी आणि सदस्य यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी स्थलांतराचा निर्णय रद्द केल्याची माहिती दिली.

रानडे इन्स्टिट्यूटच्या जागेचा वापर शैक्षणिक गोष्टीसाठीच होणार

'हा संपूर्ण वाद अकॅडमिक कमिटीचा होता. रानडे इन्स्टिट्यूटमधील जे कोर्स स्थलांतरित करण्यात येणार होते, ते रद्द करण्यात आले आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव विकास चंद्र रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली जाईल. ही कमिटी या जागेसंदर्भातील संपूर्ण अहवाल 90 दिवसात शासनाला सादर करेल. तसेच रानडे इन्स्टिट्यूटच्या या जागेचा वापर व्यवसायिक गोष्टीसाठी नाही तर शैक्षणिक गोष्टीसाठीच करण्यात येईल असं विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे', असे उदय सामंतांनी म्हटले आहे.

हेही वाचा -राष्ट्रपती शौर्य पुरस्कार : उल्हासनगरच्या फायर ब्रिगेड ऑफिसरसह चौघांना शौर्य पदक जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details