Uday Samant: स्थानिक विरोधासाठी नव्हे तर, ठाकरेंना भेटायला आले; जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल उद्योग मंत्र्यांनी वाचला - Uday Samant
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसू येथील ग्रामस्थांची भेट घेतली. दरम्यान, ग्रामस्थ विरोधापेक्षा ठाकरेंना भेटण्यासाठी आली होती, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात नमूद असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हवरून दिली.
उद्योगमंत्री उदय सामंत
By
Published : May 6, 2023, 9:20 PM IST
मुंबई:बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाला विरोध दिवसागणिक वाढतो आहे. कोणताही प्रकल्प जोर जबरदस्तीने लादला जाणार नाही. स्थानिकांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता स्थानिकांना उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या दृष्टीने सकारात्मक विचार करावा, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले.
ठाकरेंचा दौरा नेमका कशासाठी: बारसू येथील प्रकल्पाच्या जागेची तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. मंत्री उदय सामंत यांनी यावर टीका केली. उद्धव ठाकरेंचा दौरा नेमका कशासाठी होता याचा उद्देश अद्याप समजू शकलेलो नाही. 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांनी पत्र लिहिले होते. ठाकरे यांच्या पत्रानुसार त्या ठिकाणी सॉईल टेस्टिंग सुरू आहे. माती तपासणी सुरू असल्याचे सामंत म्हणाले.
खुलासा होणे अपेक्षित:आतापर्यंत 35 बोअरवेल मारून फुकट गेले आहेत. 91 बोअरवेल पैकी 51 मारल्या आहेत. पाच हजार एकरपैकी 2135 एकरचा संमती पत्र शासनाला मिळाले आहे. मात्र ठाकरेंनी दौरा केल्यानंतर दोन्ही बाजूंनी समजून घ्यायला हव्यात. तसेच मुख्यमंत्री असताना जे पत्र दिले होत त्यावर खुलासा होणे अपेक्षित असल्याचे सामंत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी कातळ शिल्पाची पाहणी केली. परंतु, नॅशनल लेवलला या प्रकल्पातून कातळ शिल्पांना वगळण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
जगातला सर्वात मोठा प्रकल्प: बारसूमध्ये होणारा रिफायनरी प्रकल्पामध्ये महाराष्ट्राला आर्थिक सक्षम करण्याची ताकद आहे. ठाकरेंनी 12 जानेवारी 2022 दिलेल्या पत्रात सुद्धा येथील सगळी जमीन ओसाड, कातळ असल्याचे असे नमूद करण्यात आले आहे. तसेच कातळ जमिनीमुळे त्यावर काहीही उगवत नाही. जगातला सर्वात मोठा प्रकल्प असल्याने तो बारसूला यावा, असे पत्रात नमूद केल्याचे सांगत मंत्री सामंत यांनी ठाकरेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी लोक आले: उद्धव ठाकरे यांच्या पाहणी दौऱ्या दरम्यान उपस्थित असलेल्या स्थानिकांचा रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल तयार केला आहे. त्यानुसार गिरमा देवी कोंड येथे पाहणी करताना तीनशे ते साडेतीनशे लोक होती. ग्रामस्थ त्यात अवघे 150 लोक तर उर्वरित बाहेरून आली होती. केवळ विरोध आणि उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आल्याचे अहवालात नमूद आहे. सोंगावं येथे किमान 200 लोक होती. त्यात 100 ग्रामस्थ उर्वरित बाहेरून आल्याचा अहवाल सांगतो.
ठाकरेंच्या मताशी आम्ही सहमत आहोत:स्थानिकांना विचारात घेतल्याशिवाय प्रकल्प राबवणार किंवा पुढे जाणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा भूमिका स्पष्ट केली आहे. तर लोकांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे घेऊन चला. पोलिसांकडून कोणताही दबाव येणार नाही, याची दक्षता घ्या, अशा सूचना महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे स्थानिकांच्या मनात ज्या काही शंका असतील, त्या दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कोणताही बळाचा वापर केला जाणार नाही. महाराष्ट्र शासन तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे. त्यामुळे अफवा, गैरसमज यावर विश्वास ठेवू नका. या प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्हा आर्थिक सक्षम होणार आहे. तरुण तरुणींना रोजगार मिळणार असल्याने, सर्वांनी सकारात्मक विचार करायला हवा, असे आवाहन मंत्री सामंत यांनी केले.