मुंबई :मंत्री उदय सामंत शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांसोबत बोलताना सामंत म्हणाले की, मी ठामपणे आत्मविश्वासाने सांगतो पुढील दीड वर्ष राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार आहे. शिवसेना भाजपची रणनीती ठरेल. पुढे देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात म्हणाले की, नऊचा भोंगा बंद झाला तर 80 टक्के कटुता संपेल. यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी म्हटले की, त्यांनी नेमके कोणाविषयी बोलले हे सगळ्यांना माहित आहे. ही त्यांची नाही तर अख्ख्या महाराष्ट्राची मागणी आहे. सकाळचा जो इव्हेंट चालतो, तो बंद करावा म्हणजे कटूता संपेल.
राजकीय भांडवल करू नये : महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांच्या सामाजिक कार्याकडे बघून दिला आहे. ते फार मोठी व्यक्ती आहेत. त्यांच्या कुठल्याही कामाचे राजकीय भांडवल करू नये, ही भूमिका मी मांडली होती. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आहे. तर कोरोनाच्या कालावधीमध्ये काही निर्णय चुकीचे घेतल्यामुळे, काही ठिकाणी भ्रष्टाचार झाल्यामुळे त्यावेळी जे काही मृत्यू झालेले आहेत. त्याच्या संदर्भात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा, याचे स्पष्टीकरण देखील त्यांनी करावे. अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांनी काय करायचे? पुढे काय करणार, हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. त्या कार्यक्रमाचे राजकीय भांडवल करू नये, असे सर्वांचे म्हणणे आहे.